Satara: पेशंट देसाई-मांडवे बंदोबस्तात तरी म्हणे केवळ ताब्यात!; ‘सिव्हिल’मध्ये उपचार; अद्याप अटक नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:41 IST2026-03-23T13:50:21+5:302026-03-23T15:41:47+5:30
सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी अपहरणाचा गुन्हा दाखल असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल देसाई तसेच संदीप मांडवे यांना ...

Satara: पेशंट देसाई-मांडवे बंदोबस्तात तरी म्हणे केवळ ताब्यात!; ‘सिव्हिल’मध्ये उपचार; अद्याप अटक नाही
सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी अपहरणाचा गुन्हा दाखल असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल देसाई तसेच संदीप मांडवे यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही पोलिस बंदोबस्तात उपचार घेत आहेत. ते केवळ ताब्यात असून, कागदोपत्री त्यांना अटक केली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी साताऱ्यात राजकीय अपहरणनाट्य घडलं. यामुळे राजकीच वातावरण चांगलेच तापले. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात मध्यरात्री अनिल देसाई व संदीप मांडवे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी अनिल देसाई व संदीप मांडवे यांना पोलिसांनी निवडीच्या काहीक्षण आधी ताब्यात घेतले.
दोघांचीही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे अपहरणनाट्य घडून तीन दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही या दोघांवर सिव्हिलमध्ये पोलिस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत. त्यांना अद्याप कागदोपत्री अटक नसून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘सिव्हिल’ बाहेरही पोलिस साध्या वेशात
जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे हे ‘सिव्हिल’मध्ये उपचार घेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी आतमध्ये कोणालाही सोडले जात नाही. चोवीस तास पोलिस त्यांच्यावर वाॅच ठेवून आहेत. तसेच ‘सिव्हिल’च्या बाहेरही साध्या वेशात पोलिस तैनात आहेत.