दोन घरे फोडून साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST2021-01-13T05:42:40+5:302021-01-13T05:42:40+5:30

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथील त्रिमूर्ती कॉलनीत अशोक कदम यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्याचा कडीकोयंडा तोडून चोरटे आत शिरले. ...

Material lamps smashed two houses | दोन घरे फोडून साहित्य लंपास

दोन घरे फोडून साहित्य लंपास

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथील त्रिमूर्ती कॉलनीत अशोक कदम यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्याचा कडीकोयंडा तोडून चोरटे आत शिरले. फाईल्ससह इतर साहित्य त्यांनी विस्कटले. तसेच किरकोळ साहित्य घेऊन पोबारा केला. सोमवारी सकाळी कॉलनीतील विलास मोहिते, शंकर मोरे, बाबासाहेब ढेबे यांना दरवाजा उघडा दिसल्याने शंका आली. त्यांनी कदम यांना फोन केला. दरम्यान, चोरट्यांनी शेजारच्याच कॉलनीतील विकास पाटील यांचे बंद घर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजारील एका रहिवाशाने आरडाओरडा केल्यावर चोरटे पळाले. विकास पाटील हे मुंबई पोलीस खात्यात नोकरी करतात.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संजय जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, प्रफुल्ल गाडे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Material lamps smashed two houses