शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा मुसळधार ! तासात ७० मिलिमीटर : नागरिकांची पळापळ

By admin | Updated: August 22, 2014 00:52 IST

जिल्ह्यातील वाई, कोरेगाव, खटाव परिसरातही सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. दुष्काळी खटाव परिसरातील बळिराजा सुखावला

सातारा : सातारा शहरासह परिसरात काल, बुधवारी सायंकाळी ढगफुटी झाली. त्याचप्रमाणे आज, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पुन्हा तासभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे सातारकरांची दाणादाण उडाली. तासाभरात शहरात तब्बल ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सातारचा गुरुवारी आठवडा बाजार असतो. तसेच गणेशोत्सवास पुढच्या आठवड्यात सुरुवात होत असल्याने गौरी-गणपतीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारात आले होते. हे खरेदीसाठी ग्रामीण भागातून लोक साताऱ्यात आले होते. दिवसभर ऊन पडलेले होते. सायंकाळी साडेचारनंतर अचानक काळे ढग जमा झाले. त्यामुळे साडेचारलाच वाहनचालकांना दिवे लावून वाहने चालवावी लागत होती. सोसाट्याचा वारा सुरू झाला अन् पावणेपाचला मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार सरींमुळे अनेक ठिकाणी पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या गाड्या बुडाल्या, त्याचबरोबर अनेक घरांत पाणी घुसले. अनेक रस्त्यांवर तळे साचल्याने कित्येक तास वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील अनेक रस्त्यांवरून ओढे वाहत असल्यासारखे पाणी वाहत होते. सखल भागामध्ये पाण्याची तळी साचली. डोंगर उतारावरून मुख्य रस्त्यावर जोडणाऱ्या रस्त्यावर चिखल व दगड साचले होते.जिल्ह्यातील वाई, कोरेगाव, खटाव परिसरातही सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. दुष्काळी खटाव परिसरातील बळिराजा सुखावला आहे. (प्रतिनिधी)