शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

मास्कच्या आडून फोफावतेय गुन्हेगारी!

By admin | Updated: August 1, 2016 00:35 IST

भर पावसात म्हणे धुराळा फार : फलटणच्या घटनेने डोेळे उघडले; बंदी घालण्याची मागणी

सातारा : अंगाची लाहीलाही करणारे ऊन, धुराळ्यापासून बचाव करण्यासाठी बाजारपेठेत तोंडाचे मास्क आहेत; पण या मास्कच्या आडून गुन्हेगारी फोफावू लागली आहे. त्यामुळे या मास्कवर तत्काळ बंदी आणण्याची गरज निर्माण झाली आहे. फलटण येथील पाचबत्ती चौकात कोणीतर अंधाराचा फायदा घेऊन लपून बसल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशीसाठी प्रयत्न करत असतानाच तोंडाला मास्क बांधून पळून जाऊ लागले. त्यांना पाठलग करून पकडले असता त्यांच्याकडे दोन एअर पिस्टलसह इतर साहित्य आढळून आले. या घटनेमुळे पोलिसांबरोबरच सर्वांचीच झोप उडाली आहे. ऊन, वारा, पावसापासून बचाव करण्यासाठी दरवर्षी नवनवीन साधने बाजारात येत असतात. ती काळाची गरजही असू शकते. त्याचा गैरवापर करण्यावर तरुणांचा भर वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अशा साधनांवर वेळीच बंदी घालण्यासाठी हालचाली होणे गरजेचे आहे. मास्कची खरी गरज उन्हाळा अन् हिवाळ्यात सर्वाधिक भासू शकते. कडक उन्हामुळे त्वचा काळवंडणे, पुरळ येणे, गरम हवा लागल्याने डोके दुखणे असा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे मास्कचा वापर केला जातो. तसेच हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी बचाव व्हायला हवा; परंतु, भर पावसातही काही तरुण मास्कचा वापर करत असल्याचे जाणवत आहे. मास्क वापरणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. (प्रतिनिधी) ओळख लपते सहज ओळखीचा माणूस जर्कीन अन् तोंडाला मास्क बांधून शेजारून गेला तरी सहजासहजी लक्षात येत नाही. या मास्कमुळे डोळे सोडले तर संपूर्ण चेहरा झाकला जातो. त्यामुळे गुन्हे करणारे सहज पसार होतात. कोणीही ओळखलेले नसल्याने समाजात उघड माथ्याने फिरतात. नाईन इन वन मास्कमध्ये विविध प्रकार आहेत. नवीन एक पट्टी रुमाल बाजारात आले आहेत. सुमारे चाळीस रुपये किमतीच्या या रुमालाचा नऊ प्रकारे चेहरा लपविण्यासाठी वापर करता येतो. हे प्रकार रुमालाच्या पॅकिंग पिशवीवर प्रसिद्ध केले आहेत. प्रिंटेड रुमाल काही रुमाल हे काळ्या रंगाचे असून, त्यावर पांढऱ्या रंगाने प्रिंटिंग केलेले असते. मानवी सापळा, कवटी यासारखे प्रिंट केलेले हे रुमाल भुताचा रुमाल म्हणूनही ओळखला जातो. अंधारात हे रुमाल वापरल्यास महिला व तरुणींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. सोनसाखळी चोरीत वाढ सातारासह उपनगरांमध्ये एकट्या दुकट्या महिला चालत निघाली असता समोरून तोंडाला मास्क बांधून काही तरुण दुचाकीवरून येतात. दुचाकीवरील दोन्ही तरुण तोंडाला मास्क बांधलेले असतात. गाडी महिलांच्या जवळ गेली असता मंगळसूत्राला हिसका मारून चोरून नेण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली होती. तसेच कमी किमतीत हे विविध रंगांमध्ये उपलब्ध असल्याने काही वेळांनंतर एक मास्क काढून दुसरा बांधला जातो. मास्क बांधणारे सारेच मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत असे नाही. लांब पल्ल्याचा प्रवास करत असताना उन्हामुळे त्रास होतो. त्यामुळे आम्ही मास्क वापरतो. - राजेंद्र यादव, सातारा