अल्पवयीन मुलीचं लग्न लावणे आई-वडिलांना भोवलं; पती-सासू-सासरेही अटकेत, संशयित रत्नागिरीतील

By दत्ता यादव | Updated: March 21, 2023 13:53 IST2023-03-21T13:52:57+5:302023-03-21T13:53:24+5:30

प्रसूतीनंतर तिचे अल्पवयीन असताना लग्न झाल्याचे समोर आले

Marriage of a minor girl should be done to the parents; Husband-mother-in-law-in-law also arrested, suspect from Ratnagiri | अल्पवयीन मुलीचं लग्न लावणे आई-वडिलांना भोवलं; पती-सासू-सासरेही अटकेत, संशयित रत्नागिरीतील

अल्पवयीन मुलीचं लग्न लावणे आई-वडिलांना भोवलं; पती-सासू-सासरेही अटकेत, संशयित रत्नागिरीतील

सातारा : मुलगी अल्पवयीन असताना मुलीचे लग्न लावून देणाऱ्या मुलीचे आई-वडील आणि सासू-सासऱ्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कारासाठी मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १७ वर्षांची असताना तिचे रत्नागिरीतील एका तरुणाशी तिच्या आई-वडिलांनी लग्न लावून दिले. लग्नानंतर मुलगी गरोदर राहिली. काही दिवसांपूर्वीच तिने मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर तिचे अल्पवयीन असताना लग्न झाल्याचे समोर आले. 

यानंतर बोरगाव पोलसांनी रत्नागिरीतील मुलीचे आई-वडील आणि सासू सासरे, पतीवर बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मुलीचे आई-वडील, सासू-सासरे आणि पतीला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे हे अधिक तपास करीत आहेत. 
 

Web Title: Marriage of a minor girl should be done to the parents; Husband-mother-in-law-in-law also arrested, suspect from Ratnagiri