शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

येरळाच्या पुनरुज्जीवनासाठी सरसावले अनेकजण

By admin | Updated: June 9, 2015 00:11 IST

पुसेगाव : तज्ज्ञांची बैठक; मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार

पुसेगाव : खटाव तालुक्यातील म्हस्कोबाच्या डोंगरात उगम पावलेल्या येरळा नदीचे पुनरुज्जीवन करून ती बारमाही प्रवाही राहावी, यासाठी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व राज्य शासन यांच्या समन्वयातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याबाबतचा मास्टर प्लॅन करण्यासंबंधी तज्ज्ञ लोकांची येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टमध्ये बैठक पार पडली. यावेळी सर्वांनीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जलबिरादरीचे प्रभाकर बंदेकर, संघटक सुनील जोशी, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, तहसीलदार विवेक साळुंखे, लघु सिंचनचे उपविभागीय अधिकारी एस. व्ही. मस्के, पुसेगावच्या सरपंच मंगल जाधव, बाळासाहेब इंगळे, प्रकाश जाधव, जोतिराम शिंदे, हणमंत शिंदे, मोळचे श्रीकांत घोरपडे, रामराव पवार, हणमंतराव गायकवाड, प्रल्हाद सावंत, लघु सिंचनचे शाखा अभियंता डी. आर. पाटील, नवनाथ साळुंखे उपस्थित होते. येरळा नदी कायमस्वरूपी प्रवाही राहावी, यासाठी नदीच्या उगम स्थानापासून सिमेंट बंधारे, खोलीकरण व रुंदीकरण करून पाणी टंचाईवर कायमची मात करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. सुनील जोशी म्हणाले, ‘डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात राज्य शासनाची मदत न घेता केवळ लोकसहभागातून सात नद्यांवर ११ हजार बंधारे बांधून त्या बारमाही प्रवाही केल्या. येरळा नदीच्या उगमापासून ३० किलोमीटर अंतरापर्यंतचा पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.’ डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘खटाव तालुका कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याठिकाणी शाश्वत पाण्याची सोय नसल्यामुळे पावसाच्या पाण्यावरच येथील शेती व्यवसाय सुरू असतो. येरळा नदीचे पुनरुज्जीवन करून बारमाही प्रवाही करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, शासन व प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार येरळा नदीचे खोलीकरण, रुंदीकरणासाठी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट सर्वतोपरी सहकार्य करेल.’ (वार्ताहर) येरळेसाठी अनेकांचे सहकार्य लाभणार...४या कार्यक्रमात पुसेगाव व परिसरात पडणाऱ्या पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत कसे मुरविले पाहिजे. येरळा नदीचे खोलीकरण तसेच रुंदीकरण, बंधाऱ्यात अडविलेले पाणी कसे मुरविले जाईल, याविषयी अनेकांनी आपापली मते मांडून चर्चेत सहभाग नोंदविला. येरळा नदी बारमाही वाहण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले.