शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरची दफनभूमी समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST

या वेळी ख्रिस्ती युवाशक्तीचे राज्याध्यक्ष राकेश सावंत, कार्याध्यक्ष गणेश ननावरे, अतुल घाटगे, ख्रिस्ती धर्मगुरू पौल वायदंडे, संतोष वाडते, सुशील ...

या वेळी ख्रिस्ती युवाशक्तीचे राज्याध्यक्ष राकेश सावंत, कार्याध्यक्ष गणेश ननावरे, अतुल घाटगे, ख्रिस्ती धर्मगुरू पौल वायदंडे, संतोष वाडते, सुशील चोपडे, अनिल महापुरे, दिनेश शिंदे, संतोष करडे, योहान मेंगे, सुरेश लोंढे, राजन भोरे उपस्थित होते.

मलकापूर पालिका हद्दीतील आगाशिवनगर येथील ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाले असून दफनभूमीच्या विविध समस्यांवर वेळोवेळी मागणी करूनही नगरपंचायतीसह लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत आहेत. दफनभूमीबाबतच्या समाजाच्या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ख्रिस्ती युवाशक्ती महाराष्ट्र, ब्लेसिंग युथ व समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

ख्रिस्ती युवाशक्तीचे अध्यक्ष राकेश सावंत म्हणाले, आगाशिवनगर येथे ख्रिस्ती समाजाला राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे ८४ गुंठे जागा दफनभूमीसाठी मिळाली आहे. या दफनभूमीवर अतिक्रमण व इतर समस्यांबाबत समाजाच्या वतीने पालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे. दफनभूमीस संरक्षक भिंत नसल्यामुळे या ठिकाणी झोपड्यांची अतिक्रमणे करण्यात आली आहेत. दफनभूमीतील अनेक कबरींची तोडफोडही करण्यात आली आहे. तसेच दफनभूमीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

अनेक वर्षांपासून ख्रिस्ती समाज दफनभूमीतील समस्यांसाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र सत्ताधारी टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. आमदार असो अथवा नगराध्यक्ष तसेच अनेक लोकप्रतिनिधींना समस्यांबाबत भेटूनही या अडचणी अनेक वर्षांपासून रखडत ठेवल्या आहेत. दफनभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात येत असून समाजाच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न चालू असल्याचे गणेश ननावरे यांनी सांगितले.