शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात दोन दिवसात २४ बाधित तर एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST

मलकापूर : गेल्या तीन महिन्यात केवळ ७२ तर गेली सात दिवसात ४४ पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यापैकी दोन दिवसात २४ ...

मलकापूर : गेल्या तीन महिन्यात केवळ ७२ तर गेली सात दिवसात ४४ पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यापैकी दोन दिवसात २४ बाधित सापडले तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत एकूण १ हजार २०२ बाधित झाले. त्यापैकी १ हजार १२१ जणांनी कोरोनावर मात केली. तर ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.

मलकापुरात डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात बाधितांचा आकडा झपाट्याने कमी झाला होता. त्यापूर्वी पहिल्या टप्प्यात एका महिन्यात शहरात ३१ रुग्ण होते. पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन व उपचाराने एक महिन्यातच शहराला कोरोनामुक्त केले होते. मात्र, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर २६ जून २० ला पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला होता. शहरात टप्प्या-टप्प्याने रुग्ण वाढतच गेले. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात तर कोरोनाने कहर केला होता. दिवसाला २५ ते ३० जण बाधित येत होते. ऑक्टोबर महिन्यात कमी होऊन सुरुवातीला दिवसाला १० ते १२ तर शेवटी केवळ ३ ते ४ च रुग्ण सापडले. नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सरासरी २ ते ३ जण बाधित येत होते. तर डिसेंबर महिन्यात केवळ १८ जणच बाधित सापडले होते. महिन्यात काही वेळेला आठ-आठ दिवस एकही रूग्ण सापडला नव्हता तर एकही मृत्यू झाला नाही.

शहरात हळूहळू संख्या कमी झाली असली तरी बाधित होण्याचे थांबलेले नव्हते. जानेवारी महिन्यात पुन्हा वाढ होत गेली. १५ जण पॉझिटिव्ह आले. फेब्रुवामध्ये १९ तर मार्च महिन्यात २५ दिवसात ३४ रुग्ण वाढले. यापुढे जाऊन गेली सात दिवसात तब्बल ४४ बाधित सापडले आहेत. त्यापैकी केवळ दोन दिवसात २४ बाधित तर एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यावरून मलकापुरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे.

चौकट

१) २२ एप्रिल ते २४ मे - ३१

२) २५ मे ते २५ जून ०

३) २६ जून ते २६ जुलै ४३

४) २७ जुलै ते २६ ऑगस्ट ३३८

५) २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर ४२८

६) २७ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबला १५९

७) २८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर ६९

८) २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर १८

९) ३१ डिसेंबर ते ३० जानेवारी १५

१०) ३१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी १९

११) १ मार्च ते २५ मार्च ३३

१२) २६ मार्च ते २ एप्रिल सात दिवसात ४४

चौकट

एकूण - १२०२ मृत्यू - ३८, डिस्चार्ज - ११२१, उपचारार्थ - ४३ रुग्णालयात - ९

होम आयसोलेट - ३४

१) मुक्तीचा दर ९३.२ टक्के २) मृत्युदर ३.१ टक्के ३) ॲक्टिव्ह रुग्ण ३.७ टक्के