पुणे-बेंगळुरु महामार्गावर बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; पाच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 08:04 AM2019-09-12T08:04:08+5:302019-09-12T13:49:44+5:30

साताऱ्यामध्ये हायवेला लागूनच डी मार्टचे दालन आहे.

major Accident of bus-truck on Pune-Bangalore highway | पुणे-बेंगळुरु महामार्गावर बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; पाच ठार

पुणे-बेंगळुरु महामार्गावर बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; पाच ठार

googlenewsNext

सातारा : पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत लक्झरी बस आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघात बसमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास झाला.

डॉ  सचिन गौडपाटील वय 45 राहणार संकेश्वर तालुका कुडगि बेळगाव, विश्वनाथ गड्डी 48 राहणार बसवन नगर गल्ली संकेश्वर,  तालुका दुवकेरी, जिल्हा बेळगाव,  गुड्डू तुकाराम गावडे, रा. बेळगाव, अशोक रामचंद्र जुंनघरे वय 50 रा. रा, दिवदे वाडी, तालुका जावळी, सातारा, चालक अब्बास अली काटकी वय  ४९, रा. इजाज गल्ली अनगोळ बेळगाव, कर्नाटक अशी अपघातात ठार झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. मात्र एकाची अद्याप ओळख पटली नाही.

याबाबत अधिक  माहिती अशी, एस आर एस कंपनीची ट्रॅव्हल्स (KA 01 AF 9506) मुंबईहून बेळगावकडे निघाली होती. या बसमध्ये दोन चालक क्लीनरसह  ३३ प्रवासी होते. ही ट्रॅव्हल्स पहाटे साडेसहाच्या सुमारास सातारानजीक असणाऱ्या म्हसवे फाट्यावर आली असता पुढे चाललेल्या ट्रकला बसने जोरदार धडक दिली. हा अपघात झाला त्यावेळी बसमधील प्रवासी गाढ झोपेत होते. चालकासह सहा प्रवाशांचा या यात जागीच मृत्यू झाला. घाबरलेल्या इतर प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. कुणाचे हात तर कोणाचे पाय तर कुणाच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. हा अपघात झाल्यानंतर महामार्गावरून धावणाऱ्या इतर वाहनचालकांनी आपली वाहने थांबून जखमींना मदत सुरू केली तर काहीनी  सातारा पोलिसांची संपर्क साधून या अपघाताची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर जखमींना मिळेल त्या खासगी वाहने साताऱ्यातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अशा अशा प्रवाशांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.  हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्सच्या पुढच्या बाजुचा चक्काचूर झाला होता. चालकाला डुलकी लागली असावी. त्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

   या अपघातात  राजश्री जयदीप पाटील ( वय २३), जयदीप रामचंद्र पाटील ( वय ३०, सर्व रा. बेळगाव) यांच्यासह १० जण जखमी झाले आहेत. जखमींवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर लक्झरी बसचा दुसरा चालक देशमुख हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. अपघातात ठार झालेल्या क्लिनरची अद्याप पोलिसांना ओळख पटली नाही. 

दरम्यान, या अपघातानंतर  पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडवरून काही काळासाठी वळवली होती.

जिल्हाधिकाऱ्यांकडून जखमींची विचारपूस

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल या तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आल्या. त्यांनी अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. उर्वरित दहा जखमींना तत्काळ उपचार करावेत, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिल्या.

नातेवाईकांच्या आक्रोशाने सिव्हिल गहिवरले

आपल्या आप्तस्वकीयांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती बेळगावमध्ये समजल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयमध्ये सकाळी 11 वाजता धाव घेतली. आपल्या प्रियजनांचे मृतदेह पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला. हा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. उपस्थित इतर रुग्णांनाही नातेवाईकांचा आक्रोश पाहून आपले अश्रू आवरता आले नाहीत.

चालकाच्या मृतदेहाचे तुकडे वेचून भरले

अपघातग्रस्त बसचा चालक अब्बास काटगी यांच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते.  त्यांचा मृतदेह लक्झरी बसमध्ये दबला गेला होता. तो क्रेनच्या साह्याने काढण्यात आला. त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक एक तुकडा भरून तो  रुग्णवाहिकामध्ये ठेवण्यात आला. इतका हा भीषण अपघात होता. घटनास्थळाचे चित्र अत्यंत विदारक होते. काळजाचा थरकाप उडवून देणाऱ्या या अपघातामुळे पोलिसांचीही मने हेलावून गेली.


 

Web Title: major Accident of bus-truck on Pune-Bangalore highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.