“महाराज, आता तिकीट द्या… नाहीतर दोरी द्या"; खासदार उदयनराजे यांच्याकडे समर्थकाची अजब मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:23 IST2026-01-19T15:18:28+5:302026-01-19T15:23:48+5:30

राज्यात जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सातारा जिल्ह्यातही राजकीय मोर्चेंबांधणीला सुरूवात झाली आहे, यामध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

“Maharaj, give me a ticket now… otherwise give me a rope to hang myself”; a supporter’s strange demand to MP Udayanraje | “महाराज, आता तिकीट द्या… नाहीतर दोरी द्या"; खासदार उदयनराजे यांच्याकडे समर्थकाची अजब मागणी

“महाराज, आता तिकीट द्या… नाहीतर दोरी द्या"; खासदार उदयनराजे यांच्याकडे समर्थकाची अजब मागणी

राज्यात जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सातारा जिल्ह्यातही राजकीय मोर्चेंबांधणीला सुरूवात झाली आहे, यामध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर हे मसूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत.

जयशंकर यांच्या समोर येताच पोलिश परराष्ट्रमंत्र्यांनी माघार घेतली; पाकिस्तानमध्ये जाऊन काश्मीरवर केले होते भाष्य

याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये कुलदीप क्षीरसागर यांनी उदयनराजे यांच्या निवडणुकीची धुरा समर्थपणे सांभाळली होती. तसेच मागील विधानसभेच्या निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, उदयनराजे यांच्या शब्दाला मान देत त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती.

या पार्श्वभूमीवर कुलदीप क्षीरसागर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपल्या उमेदवारीची मागणी उदयनराजे यांच्याकडे केली. यावेळी उदयनराजे यांच्याशी बोलताना त्यांनी, “आता उमेदवारी द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या”
अशी अजब टिप्पणी केली. ही टिप्पणी ऐकून उदयनराजे यांनाही हसू आवरता आले नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

जिल्हा परिषद नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

 राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. जिल्हा परिषेदेच्या निवडणुकीसाठी १६ जानेवारी २०२६ रोजी सूचनेचे प्रकाशन होणार आहे. अर्ज दाखल करण्याची दाखल १६ जानेवारी ते २१ जानेवारी अशी मुदत असणार आहे.  उमेदवारी माघारीची अंतिम मुदत २७ जानेवारी २०२६ तर अंतिम उमेदवारी व निवडणूक चिन्ह वाटप २७ जानेवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत असणार आहे. मतदानाचा दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ६.३० ते सायंकाळी ५.३० मतमोजणीचा दिनांक ७ फेब्रुवारी होणार आहे.

या निवडणुकांसाठी १ जुलैची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्र असमार आहेत. तसेच १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. 

Web Title : टिकट दो या फांसी का फंदा दो: समर्थक ने सांसद से कहा

Web Summary : उदयराजे भोसले के समर्थक कुलदीप क्षीरसागर ने जिला परिषद चुनाव के लिए टिकट मांगा। निराशा में, उन्होंने मजाक में उम्मीदवारी से इनकार करने पर फांसी का फंदा मांगा। स्थानीय चुनावों की घोषणा।

Web Title : Give ticket or rope to hang myself: Supporter tells MP

Web Summary : Udayanraje Bhosale's supporter Kuldeep Kshirsagar demands ticket for Zilla Parishad elections. Frustrated, he jokingly asks for a rope if denied candidacy. Local elections announced.