आॅनलाईनच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लूट

By Admin | Updated: December 2, 2014 23:35 IST2014-12-02T21:33:51+5:302014-12-02T23:35:06+5:30

शासनाने दुष्काळ व ग्रामीण मुला-मुलींना शिक्षण संस्थांकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता ढासळली आहे.

Loot by the students in the name of online | आॅनलाईनच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लूट

आॅनलाईनच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लूट

आदर्की : फलटण पश्चिम भागात दुष्काळी भागातील गोर-गरीब विद्यार्थी वर्गाला शिक्षण मिळावे, यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी शासनाच्या अनुदानातून विविध संस्थांनी माध्यमिक विद्यालये सुरू केली. परंतु संस्थाचालक राकारणात गेल्याने विद्यालयावर दुर्लक्ष झाल्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून आॅनलाईनच्या नावाखाली जादा फी घेतल्याने पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.फलटण पश्चिम तालुका कायम दुष्काळी, त्यामुळे दळणवळणाची आजही वानवा आहे. कारण आजही हजारो मुले सायकल किंवा चालत माध्यमिक विद्यालयात येतात. शासनाने दुष्काळ व ग्रामीण मुला-मुलींना शिक्षण संस्थांकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता ढासळली आहे. शिक्षकांना शाळेत येताना वेळेचे भान राहिले नाही. ग्रामस्थांचे लक्ष माध्यमिक विद्यालयाकडे दहावी व बारावीची बोर्डाची फी आॅनलाईन भरण्याच्या नावाखाली दुप्पट फी वसूल केल्याने पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Loot by the students in the name of online