शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

लोकजनशक्ती पार्टीचे गोपाळ समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:44 IST

सातारा : लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने स्वातंत्र्यदिनी पाचवड येथील गोपाळ समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी भारतरत्न ...

सातारा : लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने स्वातंत्र्यदिनी पाचवड येथील गोपाळ समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पाचवड, ता. वाई येथे ६० वर्षांपासून गोपाळ समाज राहात आहे. गट क्रमांक ६६८ मध्ये असणाऱ्या ओढ्यालगत त्यांचे वास्तव्य आहे. राहण्यासाठी पक्के घर नाही. पावसाळ्यात झोपड्यांत पावसाचे पाणी शिरते. पाण्यासोबत साप, विंचू यांचा त्रास होतो. तसेच त्यांना पिण्यासाठीही चांगले पाणी नाही. अशा स्थितीमध्ये पाचवड ग्रामपंचायतीतील काहींनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून वीजजोडणी तोडण्याचे षड्‌यंत्र केले. सध्या वीज नसल्याने लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विजेसाठी कागदपत्रांची आवश्यकता असताना ग्रामपंचायतीकडून अडवणूक केली जाते. तसेच काहींनी मुंबईच्या महावितरण कार्यालयातून संबंधित जागेत वीज मिळू नये असे मत मिळविले आहे. मात्र, या समाजाच्या व्यतिरिक्त त्याच गटात व शेजारील गटामध्ये इतर अनधिकृत राहात असणााऱ्या कुटुंबांना सर्व सुविधा मिळतात. मग, गोपाळ समाजावरच का अन्याय होत आहे?

गोपाळ समाजाने मतदानाचा हक्क अनेकवेळा बजावला आहे. या लोकांकडे आधार आणि रेशन कार्डही आहे. शासन घर नसणाऱ्यांना ते शासकीय जागेत देते, तर दुसरीकडे पाचवडमधील काहीजण या समाजाला शासकीय जागेतून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत चौकशी करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आहे.

या आंदोलनात लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपाळ समाजातील बांधव सहभागी झाले होते.

फोटो दि. १६ सातारा लोकजनशक्ती पार्टी फोटो...

फोटो ओळ : सातारा येथे लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. (छाया : जावेद खान)

.................................................