शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन तळ्यात लागला जिवंत झरा

By admin | Updated: July 20, 2014 23:17 IST

पालिकेचा पुढाकार : गोडोलीत शेततळ्याच्या धर्तीवरील तलावात २०० मूर्तींचे विसर्जन होणार

सातारा : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाच्या दृष्टीने सातारा पालिका सरसावली असून गोडोली येथे गणेश विसर्जनासाठी शेततळ्याच्या धर्तीवर तलाव खुदाई सुरू झाली आहे. या तळ्यात सुमारे सत्तर मोठ्या मूर्ती अगणित घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शक्य होणार आहे. दरम्यान, खुदाई काम करताना जिवंत झरा लागल्याने हे तळे कायमस्वरूपी विसर्जन व्यवस्था म्हणून वापरता येणार आहे.गणेश मूर्ती विसर्जनामुळे मंगळवार तळे परिसरात निर्माण झालेले प्रदूषण आणि तळ्यातील पाणी सोडल्यानंतर मूर्तींचे दिसू लागलेले भग्नावशेष यामुळे हा विषय यंदा अत्यंत गांभीर्याने घेतला गेला. ‘लोकमत’ने मंगळवार तळ्याची अवस्था आणि नागरिकांचे प्रश्न मांडून शाडूच्या मूर्ती आणि पर्यावरणपूरक विसर्जन यासाठी आग्रही भूमिका घेतली. कर्तव्य सोशल ग्रुप आणि इतर पर्यावरणप्रेमी संस्था या मोहिमेत हिरीरीने उतरल्यात. खासदार उदयनराजे भोसले यांनीही मंगळवार तळ्यात विसर्जन नको, अशी भूमिका घेतली. पालिकेने कर्तव्य ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सव मंडळांची बैठक घेऊन याकामी पुढाकार घेतला. कायमस्वरूपी मूर्तींसाठी अनेक मंडळे पुढे येऊ लागली. याच मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून पालिकेने शेततळ्यांच्या धर्तीवर विसर्जन तलाव निर्माण करण्यास सुरूवात केली आहे.गोडोली नाक्यावरून जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या जवळ एका बागेत पालिकेच्या जागेत कृत्रिम तळ्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. याच पद्धतीने मध्यवर्ती बसस्थानकासमोर हुतात्मा स्मारकाजवळ विसर्जनासाठी कृत्रिम तळे तयार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)गणेश विसर्जनासाठी यंदा गोडोली आणि बसस्थानकासमोर हुतात्मा स्मारकाजवळ नवीन दोन कृत्रिम तळी निर्माण केली जाणार आहेत. गेल्या वर्षी सदर बझार येथे दगडी शाळेजवळ आणि मोती तळ्याच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या तळ्यांच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे.- दिलीप चिद्रे, अभियंता, नगरपालिकागणेश मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन यंदा नगरपालिका आणि सर्व नगरसेवक यांच्या पुढाकारातून गोडोली येथे कृत्रिम तळे बांधले आहे. यामध्ये सुमारे दोनशे मूर्ती विसर्जनाची सोय होणार आहे.- अ‍ॅड. दत्ता बनकर, पक्षप्रतोद, सातारा विकास आघाडी