शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

सांबरवाडीत वृद्धावर बिबट्याचा हल्ला

By admin | Updated: October 25, 2015 23:33 IST

गंभीर जखमा : रानात गवत कापताना झुडपातून येऊन मारली झडप; यवतेश्वर डोंगरावरील गावे भयभीत

सातारा : गवत कापायला रानात गेलेल्या वृद्धावर बिबट्याने अचानक समोरून हल्ला केल्याने वृद्ध गंभीर जखमी झाला. साताऱ्यापासून अवघ्या चार किलोमीटरवर असलेल्या सांबरवाडी या डोंगरावरील गावात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हे थरारनाट्य घडले.गणपत अण्णा भणगे (वय ७०, रा. सांबरवाडी, ता. सातारा) असे गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते गावाजवळील काळसरी नावाच्या रानात गवत कापण्यासाठी गेले होते. गवत कापत असतानाच झुडपातून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक समोरून हल्ला केला. भणगे यांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला; मात्र या झटापटीत त्यांचे डोके, खांदे, छाती, हात आणि पायावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. थोड्या वेळाने बिबट्या तिथून निघून गेला आणि ग्रामस्थांनी भणगे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले तेव्हा साडेसहा वाजून गेले होते. भणगे यांच्यावर तातडीने उपचारास प्रारंभ करण्यात आला. त्यांच्या डोक्यावरील व खांद्यावरील जखमा गंभीर स्वरूपाच्या आहेत. दरम्यान, हे वृत्त समजताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे तसेच वन विभागाचे कर्मचारी तातडीने जिल्हा रुग्णालयात पोहोचले. उपचारांनंतर भणगे यांना तातडीने आर्थिक भरपाई दिली जाईल, असे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. यवतेश्वर, सांबरवाडी, गवडी, महादरे, अंबेदरे परिसरात बिबट्याचा वावर पूर्वीपासूनच आहे. बिबट्याचा भ्रमणमार्ग या डोंगरांना व्यापून राहिला आहे. त्यामुळे ऐनवेळी उद््भवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम करण्याची गरज असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. (प्रतिनिधी)मानव-वन्यजीव संघर्षाच्या दिशेने...सातारा शहर सात डोंगरांनी वेढले आहे. त्यातील अनेक डोंगरांवर बिबट्याचा वावर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. बिबट्या सहजासहजी माणसावर हल्ला करीत नसला तरी अशा घटनांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, वनविभागाने तातडीच्या उपाययोजना तसेच बिबट्याप्रवण क्षेत्रात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.