शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

कायदा पायदळी... मैला डोक्यावरच !

By admin | Updated: August 10, 2015 00:04 IST

अमानवी परंपरा कायम : सदर बझारमध्ये धक्कादायक वास्तव उघड

प्रदीप यादव/जावेद खान- सातारा -शौचालयातील मैला हाताने उपसणे, तो डोक्यावर घेऊन वाहणे अमानवी आहे. म्हणूनच त्या विरोधात कायदा करण्यात आला. मात्र, तो धाब्यावर बसवून सातारा शहरातील सदर बझार येथील सार्वजनिक शौचालयाची टाकी पालिकेच्या ठेकेदाराने मोटार न लावता कामगारांकडून साफ करवून घेतल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करून अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने पालिकेचा ठेकेदारधार्जिणा कारभार चव्हाट्यावर आला आहे.सदर बझार येथील नवीन भाजीमंडईनजीक महिलांसाठी चार आणि पुरुषांसाठी चार असे आठ सीटचे सार्वजनिक शौचालय आहे. अनेक वर्षांपासून शौचालयाची टाकी साफ केली नव्हती. दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या ठेकेदाराने टाकी साफ करण्याचे काम सुरू केले होते. वास्तविक, टाकीतील मैला साफ करण्यासाठी सक्शन गाडीच्या मोटारीचा वापर करायला हवा होता. मात्र, ठेकेदाराने पाच ते सहा कामगारांकडून हाताने काम करवून घेतले. कामगारांनी टाकीतील मैला बादलीने उपसून टेम्पोत ठेवलेल्या बॅरलमध्ये ओतला. त्यानंतर तो मैला सोनगाव येथील कचरा डेपोत एका खड्ड्यात टाकण्यात आला. याबाबत भाग निरीक्षक दत्तात्रय रणदिवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे काही घडले असेल याबाबत माहिती नाही; पण शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे. हे काम कसे करायचे ही त्यांची जबाबदारी आहे, असे उत्तर देऊन जबाबदारी झटकली. (प्रतिनिधी)मैला हाताने साफ करणे किंवा डोक्यावरून वाहणे, हा गंभीर गुन्हा आहे. त्यासाठी कायदा आहे. सदर बझार येथे ठेकेदाराने कामगारांकडून हाताने मैला उपसून घेतला, या घटनेबद्दल माहिती नाही; पण हा प्रकार गंभीर आहे. हे काम कोणाच्या देखरेखीखाली झाले? कुणी केले? अधिकारी कोण उपस्थित होते, याची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.- सचिन सारस, नगराध्यक्ष