Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाक्षीने दोन्ही राष्ट्रवादीचा संगम, कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:12 IST2026-02-03T16:10:51+5:302026-02-03T16:12:15+5:30

एकत्रीकरणाच्या चर्चेत आशावादी चित्र..

Led by Deputy Chief Minister Sunetra Pawar leaders of both NCPs gathered at Yashwantrao Chavan's memorial in Karad | Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाक्षीने दोन्ही राष्ट्रवादीचा संगम, कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाक्षीने दोन्ही राष्ट्रवादीचा संगम, कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक

प्रमोद सुकरे

कराड (जि.सातारा) : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी सकाळी कराडला पोहोचल्या. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराडला येत त्यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. यावेळी त्या खूपच भावुक दिसल्या; पण या निमित्ताने जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी येथे एकत्रित दिसले. कराडच्या प्रीतिसंगमावर दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा झालेला ‘संगम’ असाच कायम राहावा,’ अशा भावना उपस्थित कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होत्या.

सोमवारी सकाळी सुनेत्रा पवार कराडला पोहोचल्या. शासकीय विश्रामगृहात थोडावेळ थांबून त्या कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला पोहोचल्या. भावुक होत त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तेथून वेणूताई चव्हाण सभागृहात आल्या. तेथे त्यांनी वेणूताई चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि बारामतीला रवाना झाल्या. पण, यादरम्यान प्रीतिसंगमावर सातारा जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ‘संगम’ झालेला पाहायला मिळाला.

वाचा: विलीनीकरण कोणाचे अन् कोणत्या पक्षात होणार?, सुनील तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत

सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार व राष्ट्रवादी (शरद पवार)चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी (अजित पवार)चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, सुनील माने, अॅड. उदयसिंह पाटील, राजेश पाटील आदी मंडळी येथे एकत्रित आली. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

एकत्रीकरणाच्या चर्चेत आशावादी चित्र..

एका बाजूला राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळी मते व्यक्त करताना दिसत आहेत. अशा वेळी कराडच्या प्रीतिसंगमावर यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्रित आल्याची घटना आशावादी मानायला हरकत नाही.

काळजी घ्या!

सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व पवार कुटुंबीयांचा स्नेह सर्वश्रुत आहे. आज प्रीतिसंगमावर सुनेत्रा पवार येणार हे कळताच स्वतः श्रीनिवास पाटील, चिरंजीव सारंग पाटील, स्नुषा रचना पाटील हे तिघेही तिथे आवर्जून उपस्थित होते. सुनेत्रा पवार स्मृतिस्थळावर आल्यानंतर त्यांनी श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाहत हात जोडले. तेव्हा पाटील यांनी त्यांना ‘काळजी घ्या’ या शब्दात धीर दिला.

Web Title : सुनेत्रा पवार ने वाई.बी. चव्हाण स्मारक का दौरा किया, एनसीपी गुटों को एकजुट किया।

Web Summary : सुनेत्रा पवार की कराड यात्रा में वाई.बी. चव्हाण के स्मारक पर प्रतिद्वंद्वी एनसीपी नेता एकजुट हुए। इस घटना ने चल रही एकीकरण वार्ता के बीच आशावाद जगाया, नेताओं ने आभार और समर्थन व्यक्त किया।

Web Title : Sunetra Pawar visits YB Chavan memorial, uniting NCP factions.

Web Summary : Sunetra Pawar's Karad visit saw rival NCP leaders unite at YB Chavan's memorial. This event sparks optimism amid ongoing unification talks, with leaders expressing gratitude and support.