शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भुर्इंजमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त

By admin | Updated: August 23, 2015 00:31 IST

चौघांना अटक : पिस्तुले, तलवारी, जांबियाचा समावेश

भुर्इंज : घरांमध्ये छापे टाकून भुर्इंज पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पहाटे मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये तीन पिस्तुले, दहा तलवारी, ११ गुप्त्या आणि पाच जांबिया अशा शस्त्रसाठ्याचा त्यामध्ये समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, यामध्ये आणखी संशयित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. भुर्इंजमध्ये बेकायदा शस्त्रसाठा केल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव आणि भुर्इंज पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला बंटी ऊर्फ अनिकेत नारायण जाधव (वय १८, रा. भुर्इंज) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्याच्या घरामध्ये एक पिस्तूल, तीन तलवारी सापडल्या. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्या अन्य तीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी त्यांच्याकडे आपला मोर्चा वळविला. वरुण समरसिंह जाधव (१८, रा. भुर्इंज) याच्याकडे दोन तलवारी व एक पिस्तूल सापडले. अतुल सखाराम जाधव (रा. विराटनगर, पाचवड) याच्या घराची झडती घेतली असता दोन तलवारी व एक पिस्तूल, तसेच केतन हणमंत धुमाळ (रा. वीर, ता. पुरंदर, सध्या राहणार भुर्इंज) याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना तीन तलवारी, ११ गुप्त्या, पाच जांबिया असा मोठा शस्त्रसाठा सापडला. दरम्यान, अनिकेत व वरुण जाधवकडे सापडलेली पिस्तुले छर्ऱ्याची असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे व सहायक पोलीस निरीक्षक नारायणराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी इतर कोणाकोणाला शस्त्रे दिली आहेत, याची भुर्इंज पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे विकास जाधव, उत्तम दबडे, बंडा पानसांडे, मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे, किसन वाघ, कुडाळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टकले, लक्ष्मण डोंबाळे, गुजर, ठाकरे, हवालदार संजय थोरवे, आर. एम. भोसले, महिला पोलीस पवार, बांगर यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी) संशयित लवकरच तडिपार ! भुर्इंज व परिसरात आणखी अशा प्रकारची शस्त्रे बाळगणारे युवक असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. पकडलेल्या संशयितांपैकी काहीजणांवर लवकर तडिपारची कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे यांनी दिली.