शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

घाटातून प्रवास करताय? काळजी घ्या, यवतेश्वर घाटात पुन्हा कोसळली दरड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 11:34 IST

कासला जाण्यासाठी यवतेश्वर घाटातून वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, दरवर्षीच पावसाळ्यात यवतेश्वर घाटात दरडी कोसळण्याची घटना वारंवार घडत असते.

पेट्री : शहराच्या पश्चिमेस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात छोट्या-मोठ्या दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. या मार्गावरून जाताना पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. दरड कोसळून एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवारी रात्री घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून रस्त्यावर आली होती. दरम्यान, काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती. मंगळवारी सकाळी बांधकाम विभागाकडून दरड हटविण्यात आली.पश्चिमेस पावसाचा जोर कायम असून, यवतेश्वर घाटात काही ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात दरड कोसळून काही दगडे, मुरूम, माती रस्त्यालगत पडत आहे. यामुळे वाहनचालकांनी गाडी चालवताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे.जागतिक वारसास्थळ कास पठारावर पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने एकीव, दुंद, भांबवली धबधबे दर्शन देऊ लागल्याने तसेच दाट धुक्यात हरवलेला कास तलाव येथील हिरवागार परिसर पाहण्यासाठी पर्यटकांच्या गर्दीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कासला जाण्यासाठी यवतेश्वर घाटातून वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, दरवर्षीच पावसाळ्यात यवतेश्वर घाटात दरडी कोसळण्याची घटना वारंवार घडत असते.वाहने चालविताना काळजी घ्यागेल्या दहा-बारा दिवसांपासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे यवतेश्वर घाटात छोट्या-मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने वाहनचालकांनी वाहने चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे. घाटात वेडीवाकडी वळणे असून, रस्त्यातील वळणावरच पडलेल्या दरडीचा अंदाज यावा यासाठी वाहनचालकांनी आपली वाहने कमी वेगाने चालविणे आवश्यक आहे. वाहने घाटात थांबवून फोटोसेशन करणे धोकादायक ठरू शकते. आकस्मिक दरड कोसळली तर विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहराच्या पश्चिमेस कास, बामणोलीला पर्यटनाला जाण्यासाठी शाळा, महाविद्यालयीन तरुणाईचे प्रमाण मोठ्या स्वरूपात असून, रस्त्यावर पडलेल्या दरडीचा अंदाज न येता मोठ्या वेगाने वाहने चालवित स्टंट तसेच हुल्लडबाजी करताना दिसतात. यामुळे असे कृत्य जीवावर बेतू शकते. - कृतज्ञ साळुंके, वाहनचालक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन