शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

कोठावळेंच्या दुसऱ्या ‘पीए’नेही पदभार सोडला!

By admin | Updated: April 28, 2015 00:19 IST

कार्यकर्त्यांकडून अपमानास्पद वागणूक : अधिकारी म्हणतात... तुम्हीच ‘पीए’चे नाव सुचवा

सांगली : जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती गजानन कोठावळे यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्ते आणि काही माजी सभापतींकडून त्यांच्या ‘पीए’ला (स्वीय सहायक) अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. यातूनच सहा महिन्यात कोठावळे यांच्याकडील दोन स्वीय सहायकांनी पदभार सोडल्यामुळे अधिकाऱ्यांनाही त्यांच्याकडे कोणता स्वीय सहायक द्यावा हे कळत नाही. म्हणूनच सोमवारी अधिकाऱ्यांनीही, सभापती साहेब त् ाुम्ही सांगाल तो स्वीय सहायक देण्यात येईल, असे सांगून नाव सुचवण्याची विनंती केली आहे. यामुळे सभापतींच्या ‘पीए’चा विषय आता चांगलाच चर्चेचा बनला आहे.जिल्हा परिषदेतील सभापती, उपाध्यक्ष, अध्यक्षांना ‘पीए’ आणि शिपायांची पदे मंजूर आहेत. बहुतांशी सभापतीही स्वीय सहायकांना चांगलीच वागणूक देत असल्यामुळे ते कधीही पदभार सोडत नाहीत. उलट सभापतींकडे नेमणूक होण्यासाठी अनेक कर्मचारी नेत्यांकडे फिल्डिंग लावतात. परंतु, गेल्या वर्षभरापासून पदाधिकाऱ्यांपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून स्वीय सहायक आणि तेथील इतर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. जेवणावळ्यापासून ते चहा, अन्य सुविधा देण्यापर्यंत स्वीय सहायकांकडून त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यातूनच, सभापतींकडे स्वीय सहायक नको रे बाबा, अशा कर्मचाऱ्यांतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हाच अनुभव सध्या बांधकाम व आरोग्य समिती सभापती गजानन कोठावळे यांच्याबाबतीत येत आहे. कोठावळे हे शांत आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेणारे आहेत. यांच्याबद्दल कोणत्याही स्वीय सहायकांच्या तक्रारी नाहीत. पण, त्यांच्याकडे येणारे काही कार्यकर्ते स्वीय सहायकांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. यात माजी सभापतींचाही मोठा वाटा आहे. सहा महिन्यात दोन स्वीय सहायकांनी पदभार सोडल्याने अधिकारीही चक्रावून गेले आहेत. सभापतींनी स्वीय सहायक देण्याची अधिकाऱ्यांकडे मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी, तुम्हीच स्वीय सहायकाचे नाव सुचवावे, त्यांचा तात्काळ नियुक्ती आदेश दिला जाईल, असे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मला काम करायचे नाही...दोन दिवसांपूर्वी एका माजी सभापतीने सध्याच्या स्वीय सहायकास एकेरी भाषा वापरून त्याचा अपमान केला. लगेच त्या स्वीय सहायकाने सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना, मला कार्यालयीन कामकाज करायचे आहे. मी तेथे स्वीय सहायक म्हणून काम करणार नसल्याचे सांगितले. यापूर्वीही कोठावळे यांच्याकडील एका स्वीय सहायकाने पदभार सोडला आहे.