स्वतःसह कुटुंबीयांना व्यसनमुक्त ठेवा : दीपाली पोतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:33+5:302021-01-08T06:05:33+5:30

मायणी : ‘कर्करोगासारख्या भयंकर असंसर्गिक रोगापासून दूर राहण्यासाठी खूप काळजी घ्यायला हवी. त्यासाठी स्वतःसह कुटुंबीयांना व्यसनमुक्त ठेवा,’ ...

Keep yourself and your family free from addiction: Deepali Potdar | स्वतःसह कुटुंबीयांना व्यसनमुक्त ठेवा : दीपाली पोतदार

स्वतःसह कुटुंबीयांना व्यसनमुक्त ठेवा : दीपाली पोतदार

मायणी : ‘कर्करोगासारख्या भयंकर असंसर्गिक रोगापासून दूर राहण्यासाठी खूप काळजी घ्यायला हवी. त्यासाठी स्वतःसह कुटुंबीयांना व्यसनमुक्त ठेवा,’ असे आवाहन खटाव तालुका आरोग्य विभागाच्या समुपदेशक दीपाली पोतदार यांनी केले.

धोंडेवाडी (ता. खटाव) येथील चंद्रसेन विद्यामंदिर या मंदिरात तंबाखूमुक्त शाळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्याध्यापक संजय जगताप, दत्तात्रय शिंदे, शुभांगी मगर आदी प्रमुख उपस्थित होते.

पोतदार म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी चांगली संगत करावे, मित्रांच्या संगतीमुळे तंबाखू खाण्यासह अन्य व्यसन लागणार नाही. याची काळजी घ्यावी. व्यसनामुळे विविध प्रकारचे कर्करोग होत असतात त्यापासून दूर राहण्यासाठी स्वतःसह कुटुंबीयांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. आपली शाळा, आपले कुटुंब व आपले गाव व्यसनमुक्त होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी समाजातील इतर घटकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करावे.’

जगताप म्हणाले, ‘तंबाखूमुक्त शाळा उपक्रमांतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन शाळा पातळीवर करण्यात आले होते. दीर्घायुष्यासाठी व्यसनमुक्ती अतिशय महत्त्वाची असून, कोणतेही व्यसन जडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.’

शुभांगी मगर यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Keep yourself and your family free from addiction: Deepali Potdar