शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना खुणावतोय कास-बामणोलीचा पाऊस

By admin | Updated: July 27, 2014 00:20 IST

हिरवळ दाटली चोहिकडे : छोट्या धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद

बामणोली : पावसामुळे कास-बामणोली परिसराचे सृष्टिसौंदर्य बहरून आले आहे. येथील डोंगरकड्यांवरून कोसळणारे छोटे धबधबे, हिरव्या पाऊलवाटा अन् बामणोली जलाशय खुणावू लागल्याने याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.सलग आलेल्या सुट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक कास-बामणोली परिसरात गर्दी करू लागले आहेत. शनिवारी सकाळपासूनच पर्यटकांच्या गाड्या सांबरवाडी घाटातून कासकडे निघाल्या होत्या. गेले पंधरा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे अधूनमधून रिमझिम सरींमध्ये भिजण्याचा आनंद लुटताना पर्यटक दिसत होते. हौशी पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला थांबून जेवणावर यथेच्छ ताव मारला. साबंरवाडी येथे पोलिसांनी चेकनाका सुरू केल्याने अनेक जोडप्यांची आज पंचाईत झाली. शनिवारी दिवसभरात पुणे, मुंबई येथील सुमारे ११० वाहनांमधून २५० पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.कास तलाव तसेच रस्त्यालगतच्या डोगरकडांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांत भिजण्याचा मनसोक्त आनंद पर्यटकांनी लुटला. कोयना धरण निम्म्याहून अधिक भरल्याने तसेच बामणोलीचा बोट क्लब तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झाल्याने शनिवारी अनेक पर्यटकांनी नौकाविहाराचाही आनंद लुटला. अनेक तरुण धूमस्टाईलने बाईक चालवत असल्याने रस्त्यावरील पादचाऱ्यांना अपघाताचा धोका आहे, यासाठी चेक नाक्यावरील पोलिसांना दुचाकीस्वारांना योग्य समज द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.कास पठारावर प्रवेश शुल्क आकारणी सुरूकास पुष्प पठारावर आज (शनिवार)पासून वन समित्यांमार्फत पर्यटकांना प्रवेशशुल्क आकारण्यास प्रारंभ झाला. कास पुष्प पठारावर फुलांचा हंगाम सुरू होण्यास सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी बाकी असतानाही अनेक पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.