शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडमधील आणखी काही नगरसेवकांना ‘कमळा’ची भुरळ !

By admin | Updated: September 15, 2014 23:20 IST

आजच्या मेळाव्याकडे लक्ष : मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी भाजपचे प्रयत्न

प्रमोद सुकरे - कऱ्हाड -हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विक्रम पावसकर महिन्यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले असताना आणखी काही नगरसेवकांना ‘कमळा’ची भुरळ पडल्याची चर्चा आहे़ पालिकेत सत्तेत ‘गडकरी’ असणारा नगरसेवकांचा एक गटच भाजप नेत्यांच्या संपर्कात आहे म्हणे..! आजवर ज्यांचे नेतृत्व मानले ्त्यांच्या हातात हात देणार की, हातात कमळ धरणार याचा निर्णय मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात होईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून राजेंद्र यादव, विजय यादव यांची ओळख़ पृथ्वीराज चव्हाण पंतप्र्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री झाल्यावर असो अथवा मुख्यमंत्री झाल्यावर असो, त्यांच्या कऱ्हाडातील जंगी स्वागतात हे दोघे नेहमीच अग्रभागी राहिले; पण अडीच वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीवेळी कुठेतरी माशी शिंकली अन् राजेंद्र यादवांचा आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशी समझोता झाला. त्यातून यशवंत विकास आघाडी निवडणुकीत उतरली़ त्यांचे सहा नगरसेवक आहेत़ यादव स्वत: उपनगराध्यक्ष आहेत़ तेव्हापासून शहराच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे़ सहा महिन्यांपूर्वी कऱ्हाड दक्षिणच्या संभाव्य उमेदवारांत त्यांचेही नाव होते़ मात्र मध्यंतरी थोडासा ब्रेक लागला; पण गेल्या आठ दिवसात त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत़ मंगळवारी (दि़ १६) त्यांनी या संदर्भात कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतलाय़ त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे़ दरम्यान, रविवारी पंकजा मुंडे सातारा दौऱ्यात असताना यादव बंधूंनी त्यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. राष्ट्रवादी मेळाव्याकडे पाठ कऱ्हाड पालिकेत लोकशाही व यशवंत विकास आघाडीची सत्ता आहे़ लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील दक्षिणेतून राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी मेळावा घेतला होता. त्याच्या निमंत्रणपत्रिकेवर उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचे नाव होते़ मात्र, यादवांसह त्यांच्या नगरसेवकांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली़ विधानसभा निवडणुकीत काय करायचे याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही़ मंगळवारी आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे़ यावेळी कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील निर्णय घेणार आहे़ - राजेंद्र यादव, उपनगराध्यक्ष, कऱ्हाड