शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कुठरे-मेरवेवाडी ग्रामपंचायतींत अपहार

By admin | Updated: July 13, 2014 22:29 IST

ग्रामस्थांची तक्रार : चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सणबूर : कुठरे-मेरवेवाडी, ता़ पाटण येथील ग्रामपंचायतींमध्ये चार वर्षांपासून सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करण्यात आला आहे. तसेच शासकीय निधीचा अपहार करण्यात आला आहे़ एका महिन्यात याची चौकशी करून अपहाराची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय कोकरे़, माजी सरपंच दिनकर मोरे आणि सदाशिव सपकाळ यांनी केली आहे़ याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या तक्रारअर्जात म्हटले आहे की, चार वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली़ त्यामुळे शंकर पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली़ मात्र, त्यांनी सरपंच झाल्यापासून कधीही ग्रामस्थांना एकत्रित बोलवून विकासकामांबाबत चर्चा केली नाही़ ग्रामसेवकाला हाताशी धरून शासकीय निधीचा गावाच्या विकासासाठी वापर न करता तो निधी स्वत:च लाटला़ पर्यावरण संरक्षण योजना, तेरावा वित्त आयोग तंटामुक्त अभियान पुरस्काराची रक्कम कुठे खर्च केली, हे देखील अद्याप कळाले नाही़ ग्रामस्थांकडून नळ योजनेसाठी गोळा केलेली रक्कमही गायब करण्यात आली़ नवीन नळयोजनेच्या दुरुस्तीसाठी खर्च दाखवून पैसे काढले आहेत. गत वर्षापासून आम्ही सरपंच व ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा हिशोब मागत आहे. मात्र, त्यांनी तो दिला नाही़ याशिवाय ग्रामसभाही घेतली नाही़ याबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनाही वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांनी दखल घेतलेली नाही़ याप्रकरणी रक्कम वसूल करून ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली. (वार्ताहर)