शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

जीपवर झाड कोसळून दहा जखमी

By admin | Updated: April 25, 2015 00:01 IST

दहाजण गंभीर : पाटण-कऱ्हाड मार्गावर अडूळ येथे दुर्घटना, दोघांची प्रकृती चिंताजनक

मणदुरे : धावत्या वडाप जीपवर अचानक वडाचे झाड कोसळल्याने दहा प्रवासी गंभीर जखमी झाले. पाटण-कऱ्हाड मार्गावर अडूळ गावच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण ते कऱ्हाडपर्यंत मल्हारपेठ गावापर्यंत रस्त्यानजीक वडाची अनेक झाडे आहेत. या झाडांच्या फांद्या मोडून अनेकवेळा रस्त्यावर पडतात; मात्र या झाडांमुळे आजपर्यंत कधीही मोठी दुर्घटना घडली नव्हती. दरम्यान, आडूळ हद्दीत असणाऱ्या एका वडाच्या झाडाच्या बुंध्याला अज्ञाताने आग लावली होती. दोन दिवसांपासून झाडाचा बुंधा आगीने धुमसत होता. शुक्रवारी दुपारी पाटणहून कऱ्हाडकडे प्रवासी घेऊन निघालेली जीप (एमएच ११ एफ १२५८) अडूळनजीकच्या साटम आश्रम येथे आली असताना अचानक वडाचे झाड या जीपवर कोसळले. यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. वडाच्या झाडाखालीच जीप सापडल्याने प्रवासी जीपमध्येच अडकून पडले. परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना जीपमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कुऱ्हाडीच्या साह्याने काही फांद्या तोडून प्रवाशांना जीपमधून बाहेर काढले गेले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलविले. पाटणचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. अपघाताची नोंद पाटण पोलिसांत झाली आहे. (वार्ताहर)