शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

जाशीची युवती बनली एकोणीसाव्यावर्षी लेखिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

म्हसवड : जाशी (ता. माण) येथील ऋतुजा शांतिलाल पाटील हिने वयाच्या सतराव्यावर्षी कादंबरी लेखनाचं एक छोटंसं स्वप्न पाहिलं होतं. ...

म्हसवड : जाशी (ता. माण) येथील ऋतुजा शांतिलाल पाटील हिने वयाच्या सतराव्यावर्षी कादंबरी लेखनाचं एक छोटंसं स्वप्न पाहिलं होतं. वयाच्या अठराव्यावर्षी तिने कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली आणि वयाच्या एकोणीसाव्या वर्षी तिने ‘झुळूक’ ही कादंबरी लिहून पूर्ण केली. तिची ही कादंबरी आता प्रकाशित होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जाशी (ता. माण) या दुष्काळी भागातील छोट्याशा गावात जन्मलेल्या ऋतुजा पाटील हिने वयाच्या सतराव्यावर्षी कादंबरी लेखनाचं एक छोटंसं स्वप्न पाहिलं होतं. वयाच्या अठराव्यावर्षी तिने कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. परंतु अचानक तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचे वडील आपल्या मुलीचे स्वप्न पाहण्याआधीच देवाघरी गेले. त्यातून तिला सावरण्यासाठी व त्या दुःखाच्या ढिगाऱ्यातून बाहेर निघण्यासाठी खूप वेळ गेला. तरीसुद्धा तिने जिद्द, चिकाटी न सोडता व हार न मानता त्यातून बाहेर पडत एकोणीसाव्यावर्षी कादंबरीचे उर्वरित लिखाण पूर्ण केले आणि साहित्य क्षेत्रामध्ये एक उत्तुंग भरारी घेतली. खरं तर ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. ऋतुजा हिने आपले पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण जाशी या गावामध्ये पूर्ण केले. उर्वरित शिक्षणाच्या वाटचालीस ती सातारा येथे यशवंतराव चव्हाण कॉलेजला गेली व तेथे बारावी झाल्यानंतर, तिने यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे डिप्लोमाला प्रवेश घेतला; परंतु ताण-तणावामुळे व वडिलांच्या आठवणींमुळे डिप्लोमा तिने अर्ध्यातच सोडून दिला आणि छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे तिने बी.ए. च्या पहिल्या वर्षास प्रवेश घेतला. तसेच मराठी दैनिकांसाठी ती लेखांचेही लिखाण करत असते. तिचे अनेक लेखही प्रसिद्ध झाले आहेत. शिक्षण घेत अनेक परिस्थितीशी तोंड देत तिने साहित्य लिखाणाची चिकाटी कायम ठेवल्याने तिने ‘झुळूक’ ही कादंबरी एवढ्या कमी वयात लिहून पूर्ण केली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोट..

‘झुळूक’ या कादंबरीचे प्रकाशन पुढच्या महिन्यात करण्यात येणार असून सध्या मी ‘वणवा’ ही दुसरी कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली आहे.

- ऋतुजा पाटील, जाशी (ता. माण)

०४ऋतुजा पाटील