शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

जाधवांचे कार्यालय राजेंसाठी म्हणे ‘लकी’

By admin | Updated: September 25, 2014 23:26 IST

तोफांचे नियोजन : खासदार-आमदारांचे प्रचारकेंद्र एकच

सागर गुजर- सातारा  -लोकसभा निवडणुकीतील खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रचार कार्यालय आणि आता विधानसभा निवडणुकीतील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रचार कार्यालय एकच आहे. तालीम संघाशेजारील अमर जाधवांच्या घरातून प्रचाराच्या तोफांचे नियोजन केले जात आहे. हे कार्यालय उदयनराजेंसाठी लकी ठरले. ते विक्रमी मताधिक्याने निवडून आले. आता जाधवांच्याच घराची निवड शिवेंद्रसिंहराजेंनीही प्रचार कार्यालयासाठी केली आहे. राष्ट्रवादी, काँगे्रस, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांनी अद्याप जागावाटपाचा निर्णय जाहीर केला नसला तरी शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीतर्फे सातारा-जावळी मतदारसंघाची उमेदवारी मिळणारच, अशी खात्री बाळगून कार्यालय सुरू केले. कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या कमानीवर लावलेल्या फ्लेक्स बोर्डवर एका बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तर दुसऱ्या बाजूला शिवाजीराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले व स्वत: शिवेंद्रसिंहराजेंचा फोटो आहे. या कार्यालयात गाद्या व तक्के अंथरलेले पाहायला मिळतात. रोज सकाळी या ठिकाणी दिवसभराच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक होते. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजेंसह कार्यकर्ते बाहेर पडतात. दिवसभरात एक-दोन कार्यकर्तेच या कार्यालयात पाहायला मिळतात. उदयनराजेंनी प्रचार कार्यालयात संगणक ठेवले होते. सध्या मात्र अशी यंत्रणा इथे पाहायला मिळत नाही.