रेल्वेच्या ऑफिसरसह पाच जणांवर जाचहटाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST2021-02-26T04:54:32+5:302021-02-26T04:54:32+5:30

सातारा : फ्लॅटसाठी पैसे दिले नाही म्हणून सासरच्या मंडळींनी जाच केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात रेल्वेच्या ऑफिसरसह पाच ...

Investigation against five persons including a railway officer | रेल्वेच्या ऑफिसरसह पाच जणांवर जाचहटाचा गुन्हा

रेल्वेच्या ऑफिसरसह पाच जणांवर जाचहटाचा गुन्हा

सातारा : फ्लॅटसाठी पैसे दिले नाही म्हणून सासरच्या मंडळींनी जाच केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात रेल्वेच्या ऑफिसरसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला.

विशाल सुरेश पवार (वय ३३), अलका सुरेश पवार (वय ५५, दोघे रा.शाहूपुरी), अश्विनी घोलप (रा.कल्याण), प्रवीण ननावरे (वय ४०), नमिता ननावरे (वय ३८, दोघे रा.करंजे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्राजक्ता विशाल पवार (मूळ रा.सासपडे, ता.सातारा, सध्या रा.शाहूपुरी) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहिता प्राजक्ता पवार यांना संशयितांनी डिसेंबर २०१५ पासून ते २३ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत शारीरिक, मानसिक त्रास देऊन जाचहट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विवाहिता प्राजक्ता यांचे पती विशाल पवार हे रेल्वे विभागात रिझर्व्हेशन ऑफिसर आहेत तसेच संशयित हे त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक आहेत.

Web Title: Investigation against five persons including a railway officer