ढाकणीत संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:27 IST2021-06-03T04:27:57+5:302021-06-03T04:27:57+5:30

म्हसवड : राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटर्सची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ...

Institutional Separation Room started in Dhaka | ढाकणीत संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू

ढाकणीत संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू

म्हसवड : राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटर्सची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटर्सची संख्या वाढवण्यात येणार आहे, असे केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेले रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात, त्यालाही आळा बसेल, या उद्देशाने ढाकणी ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषद शाळेत कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाची वाढणारी साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनबरोबर आयसोलेशन कोविड सेंटरची गरज आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, गृह विलगीकरणामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होत आहे. त्यामुळे माण तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरणाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे ढाकणी ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले. या उद्देशाने ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषद शाळेत कोरोना रुग्णांसाठी हे सेंटर सुरू आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, अजून बेड वाढवण्यात येणार आहेत, अशी माहिती ढाकणीचे सरपंच दत्ताभाऊ शिंदे यांनी दिली.

यावेळी सरपंच, आरोग्य सेवक, कृषी विभागाचे आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य, आपत्ती समिती सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

कोेट..

ढाकणीमध्ये बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणामध्ये राहावे, जेणेकरून इतर नागरिक बाधित होणार नाहीत. गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कोरोना काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे.

- दत्ताभाऊ शिंदे, सरपंच, ग्रामपंचायत, ढाकणी

Web Title: Institutional Separation Room started in Dhaka