मसूर येथील विलगीकरण कक्षाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:27 IST2021-06-03T04:27:54+5:302021-06-03T04:27:54+5:30

मसूर : मसूर (ता. कऱ्हाड) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने त्रिमूर्ती मंगल कार्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाला ...

Inspection of Separation Room at Masur | मसूर येथील विलगीकरण कक्षाची पाहणी

मसूर येथील विलगीकरण कक्षाची पाहणी

मसूर : मसूर (ता. कऱ्हाड) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने त्रिमूर्ती मंगल कार्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाला सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन येथील सर्व नियोजन पाहून समाधान व्यक्त केले.

यावेळी विनय गौडा यांनी विलगीकरण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कऱ्हाड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, कऱ्हाड तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद चव्हाण, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी, मसूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे व मसूरमधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Inspection of Separation Room at Masur