शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पुरावे दाखल करून घेण्यास चौकशी अधिकाऱ्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST

सातारा : सातारा पालिकेत घडलेल्या लाचखोर प्रकरणातील मूळ तक्रारदार व यशश्री एंटरप्रायझेसचे प्रकल्प व्यवस्थापक अमित शिंदे यांनी सादर केलेले ...

सातारा : सातारा पालिकेत घडलेल्या लाचखोर प्रकरणातील मूळ तक्रारदार व यशश्री एंटरप्रायझेसचे प्रकल्प व्यवस्थापक अमित शिंदे यांनी सादर केलेले पुरावे रेकॉर्डवर घेण्यास चौकशी अधिकारी डॉ. के.आर. सिंघल यांनी गुरुवारी नकार दर्शविल्याने या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणात तडजोड झाल्याचा आरोप करत शिंदे यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी सामान्य प्रशासनाच्या सचिवांकडे केली आहे.

सातारा पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना २ लाख ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ जून २०२० रोजी रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणात आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे, प्रवीण यादव व गणेश टोपे यांची नावे समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील संबंंधित अधिकाऱ्यांची निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. के.आर. सिंघल यांच्याकडून स्वतंत्र चौकशी केली जात आहे. गुरुवारी राजेंद्र कायगुडे यांची चौकशी करण्यात आली.

या प्रकरणातील मूळ तक्रारदार अमित शिंदे यांनाही पुराव्यानिशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र चौकशीदरम्यान सिंघल यांनी शिंदे यांच्याकडील पुरावे रेकॉर्डवर घेण्यास नकार दर्शविला. शिंदे यांनी कारण विचारताच यशश्री एंटरप्रायझेसचे प्रोपरायटर मनवे यांना हजर करावयास सांगून तुमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, अशी भूमिका सिंघल यांनी घेतली. चौकशी अधिकाऱ्यानेच मूळ तक्रारदाराचे पुरावे नाकारल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

दरम्यान, संशयित आणि चौकशी अधिकारी यांच्यात काही तडजोड झाल्याचा आरोप अमित शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे त्यांनी तातडीने लेखी तक्रार करून लाचखोर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.