घराच्या जागेवरून वादात साताऱ्यात जावयाकडून सासऱ्याचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:33 IST2019-05-03T12:30:52+5:302019-05-03T12:33:16+5:30
घराच्या जागेवरून सुरू असलेल्या वादातून जावयाने सासऱ्याचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास करंजे पेठेमध्ये घडली.

घराच्या जागेवरून वादात साताऱ्यात जावयाकडून सासऱ्याचा निर्घृण खून
सातारा : घराच्या जागेवरून सुरू असलेल्या वादातून जावयाने सासऱ्याचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास करंजे पेठेमध्ये घडली.
जावई मनोज दोडमणी याने त्याच्या अन्य एका साथीदारासह सासरे विलास महादु बनसोडे (वय ६०, रा. कुपर कॉलनी, सदर बझार सातारा) यांच्या डोक्यात, पाठीवर, हातावर, पायावर दांडक्याने व लोखंडी रॉडने जबर मारहाण करून त्यांची हत्या केली.
या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ करंजे पेठेमध्ये धाव घेतली. खून केल्यानंतर जावई मनोज दोडमनी व त्याचा साथीदार हा घटनास्थळावरून पसार झाला.
पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला. घराच्या जागेवरून हा खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.