शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अपक्षांच्या किल्ल्यात पक्षांची कसोटी!

By admin | Updated: September 15, 2014 23:12 IST

आघाडी-युती हातघाईवर : गेल्या दोन निवडणुकांचा इतिहास बदलणार?

वाई : वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघावर गेल्या दोन निवडणुकांमध्ये अपक्षांनीच बाजी मारली आहे. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर विजय मिळवणे माजी-माजी आमदारांना मागील दोन निवडणुकांत शक्य झालेले नाही. यावेळी ते शक्य व्हावे म्हणून आघाडी आणि युतीतील सर्वच पक्ष हातघाईवर आले आहेत.मागील निवडणुकीत दोन्ही काँग्रेसनी राज्यात एकत्रित लढत दिली होती. वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातून तत्कालीन आमदार मदन भोसले काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र, राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यामुळे मतदारसंघातील अपक्षांच्या विजयाची परंपरा कायम राहिली. तत्पूर्वी २००४ च्या निवडणुकीत मदन भोसले अपक्ष म्हणून विजयी झाले होते.प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघात सत्तेचा सारिपाट सतत बदलत गेला आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्येच सरळ (अप्रत्यक्ष) लढत झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांचे पक्के वैरी झाल्याचे दिसून आले आहे. केवळ काँग्रेसच आघाडीधर्म पाळण्यास बांधील नसल्याचे स्पष्ट संकेत माजी आमदार, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिले असल्याने आगामी निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यांत निर्माण झाले आहे.केंद्रात एकहाती सत्ता मिळविलेल्या भारतीय जनता पक्षाची देशात लाट असल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. या लाटेत सामील होण्याचा आग्रह मदन भोसले यांच्याकडे कार्यकर्त्यांनी धरला असून, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी दोन वेळा कार्यकर्त्यांचा मेळावाही आजवर घेण्यात आला आहे. मात्र, आपला निर्णय मदन भोसले यांनी अजूनही गुलदस्त्यातच ठेवला असल्याने कार्यकर्त्यांमध्ये ‘विठ्ठला... कोणता झेंडा घेऊ हाती,’ म्हणण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीमधून विद्यमान आमदार मकरंद पाटलांना उमेदवारी दिल्याचे जाहीर करण्यात आल्याने मदन भोसले यांच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात शिवसेना-भाजपची ताकद आजवर जास्त दिसून आलेली नाही. शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षांनी लोकसभा निवडणूक अपक्ष लढविली होती. यंदाची विधानसभा निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी त्यांनीही राजकीय सारिपाटावर आपला फासा टाकला आहे. धनगर समाजाने काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान न करण्याचा निर्णय घेऊन नेत्यांची ‘हवा टाइट’ केली आहे. मात्र, मागील निवडणुकीसारखा एखाद्या भूमिपुत्राने ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उडी मारली तर या मतदारसंघातील सामना रंगतदार ठरू शकतो. २००९ चे चित्---२००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत अपक्ष आमदार मकरंद पाटील विजयी झाले. काँग्रेसचे तिकीट त्यावेळी मदन भोसले यांना मिळाले होते. मकरंद पाटील यांना २१ हजार ८२५ मतांची आघाडी मिळाली होती. एकूण मतदान १ लाख ९९ हजार ७६ इतके झाले होते. उमेदवार आणि त्यांना  -मिळालेली मते :मकरंद पाटील (अपक्ष) ८०,८८७मदन भोसले (काँग्रेस) ६९,०६२पुरुषोत्तम जाधव (शिवसेना) ३५,४५२अशोक गायकवाड (रिपाइं) ८,०२५नितीन भरगुडे-पाटील (अपक्ष) ८,७१६राजाभाऊ खरात (मनसे) २,५६५दिलीप जगताप (अपक्ष) ९६२संजय कदम (अपक्ष) ४२७शिवाजी मोरे (अपक्ष) १,०२४सुधा साबळे (अपक्ष) १,५३४२००४ चे चित्र--एकूण मतदार : ३,१२,४५६४वाई - १,५६,४९४ (महिला : ७७,३९१, पुरुष : ७९,१०३)४खंडाळा - १,०४,२६५ (महिला : ४९,९७८, पुरुष : ५४,२८७)४महाबळेश्वर - ५१,६९७ (महिला : २५,९०७, पुरुष : २५,७९०)

अपक्ष, बंडखोरांच्या संख्येचाही परिणामसंजीव वरे - वाई पूर्वीच्या वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघाला पुनर्रचनेत २००९ मध्ये महाबळेश्वर तालुकाही जोडला गेला. त्यामुळे हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या बरोच मोठा झाला. भौगोलिक रचना बदलूनही २००४ प्रमाणेच २००९ मध्येही अपक्ष उमेदवार विजयी झाला असल्याने २०१४ मध्ये काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मागील निवडणुकीची आकडेवारी आणि पहिल्या दोन उमेदवारांमधील मतांचे अंतर पाहता अपक्ष आणि बंडखोर उमेदवार किती, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.