शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या विरहाने पतीने घेतले पेटवून, साताऱ्यातील मोती चौकातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:50 IST

पत्नीच्या विरहाने पतीने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी मोती चौकामध्ये घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पतीवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देपत्नीच्या विरहाने पतीने घेतले पेटवूनसाताऱ्यातील मोती चौकातील घटना

सातारा : पत्नीच्या विरहाने पतीने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी मोती चौकामध्ये घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पतीवर उपचार सुरू आहेत.विजय श्रावण जाधव (वय ४५, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून मोती चौकामध्ये गजरा विकण्याचे काम करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यामुळे ते नेहमी मानसिक तणावाखाली असायचे. गुरूवारी सकाळी ते नेहमी प्रमाणे गजरा विकण्यासाठी मोती चौकात आले.गणेशोत्सवाची धामधूम सुरू असल्यामुळे चौकात नेहमीपेक्षा नागरिकांची गर्दी जास्त होती. अचानक बाटलीतून आणलेले पेट्रोल जाधव यांनी स्वत:च्या अंगावर ओतले. काढी ओढून स्वत:ला पेटवूनही दिले. हा प्रकार त्यांच्या शेजारी असणाऱ्या इतर विक्रेत्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला.

काही मिनिटांतच आग विझवली गेली. यामध्ये जाधव हे ५० टक्के भाजून गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ उडाली. जाधव यांचे मित्र धीरज घाडगे यांनी जाधव यांना रिक्षातून तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.साताºयातील भर वस्तीमधील गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. विजय जाधव यांना सिव्हिलमध्ये दाखल केल्यानंतर तहसीलदारांनी त्यांचा मृत्यूपूर्व जबाब घेतला. यामध्ये त्यांनी पत्नीच्या विरहामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे नमूद केले आहे. जाधव यांना एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचेही पोलिसांनी सांगितले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर