शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

भीषण आगीत रेडकाचा होरपळून मृत्यू, न्हावी बुद्रुक येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 7:24 PM

कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रूक येथील धनगरवाड्यात अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या चार गंजी जळून खाक झाल्या. तर गोठ्यात बांधलेल्या लहान रेडकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर दुसरे रेडूक ९० टक्के भाजून जखमी झाले आहे. या भीषण आगीत चार शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देभीषण आगीत रेडकाचा होरपळून मृत्यू, न्हावी बुद्रुक येथील घटना चार गंजी जळून खाक : सुमारे दोन लाखाचे नुकसान

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रूक येथील धनगरवाड्यात अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या चार गंजी जळून खाक झाल्या. तर गोठ्यात बांधलेल्या लहान रेडकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर दुसरे रेडूक ९० टक्के भाजून जखमी झाले आहे. या भीषण आगीत चार शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दि. १६ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास न्हावी बुद्रूक येथील धनगरवाड्यातील कडब्याच्या एका गंजीला अचानक आग लागली. आग एवढी भीषण होती की, काही वेळेतच बाजूला असलेल्या इतर तीन गंजींनीही पेट घेतला. यामध्ये भाऊ यशवंत बोरकर यांची गंज जळाली, एका रेडकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर एक रेडूक भाजून गंभीर जखमी झाले.

शेजारी असलेल्या शेणखताच्या उकीड्यातील शेणखतही जळून खाक झाले. याबरोबरच मधुकर यशवंत बोरकर, संतोष बाळू बोरकर व शिवाजीराव बोरकर यांच्या प्रत्येकी एक अशा चार कडब्याच्या गंजीची जळाल्या. दरम्यान आगीचे तांडव पाहून अनेक युवकांनी व ग्रामस्थांनी जनावरांच्या गोठ्यांमधील इतर म्हशीच्या दोरी कापल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

ग्रामस्थांनी नगरपालिकेशी संपर्क साधल्यानंतर काही वेळातच रहिमतपूर येथील अग्नीशामक बंब घटनास्थळी हजर झाला. प्रयत्नांच्या पराकाष्टा केल्यानंतर सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आली. आगीच्या घटनेमुळे धुराचे लोट बाहेर पडल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. माजी सरपंच राहूल निकम यांनी बचाव कार्यासाठी युवकांना घटनास्थळी उभे केले. दरम्यान या लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.

टॅग्स :fireआगSatara areaसातारा परिसर