शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या मित्रांकडून वडिलांवर चाकूने वार, राजवाडा परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 11:48 IST

सातारा तालुक्यातील आकले येथे अल्पवयीन मुलीने वडिलांचा गळा आवळून खून केल्याची घटना ताजी असतानाच साताऱ्यातही मुलीच्या पाच ते सहा मित्रांनी वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जखमी वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्दे मुलीच्या मित्रांकडून वडिलांवर चाकूने वार, राजवाडा परिसरातील घटनापोलिसांत गेला तर जीवे मारण्याची धमकी

सातारा : सातारा तालुक्यातील आकले येथे अल्पवयीन मुलीने वडिलांचा गळा आवळून खून केल्याची घटना ताजी असतानाच साताऱ्यातही मुलीच्या पाच ते सहा मित्रांनी वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जखमी वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चंद्रेशेखर भुरके (वय ५९, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) असे जखमी वडिलांचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, भुरके हे राजवाडा येथील एका हॉटेलमध्ये काम करतात. दि. १५ रोजी रात्री साडेदहा वाजता ते घरी जात असताना नगर वाचनालयाजवळ एका मुलाने त्यांना हाक मारली. त्यामुळे ते थांबले. तेथे असणाऱ्या पाच ते सहाजणांनी अचानक त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यातील एकाने चाकूने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी भुरके यांनी हाताने तो वार चुकविला. त्यांच्या डाव्या हातावर चाकूचा वार वर्मी बसल्याने ते रक्तबंबाळ झाले. पाठीत, बरकडीवर लाथाबुक्या मारून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना मारहाण सुरू असताना त्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी तेथे काहीजण आले. त्यामुळे संबंधित हल्लेखोर तेथून पसार झाले.

रिक्षा चालकांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया केली. त्यांच्या डाव्या हाताला आठ टाके पडले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भीतीने हा प्रकार सांगितला नाही.तू जर पोलिसात गेल्यास तर तुला जीवे मारीन, अशी संबंधितांनी त्यांना धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी आपण जिन्यावरून पडलो असल्याचे पोलिसांना सांगितले होते. 

मी जर गप्प बसलो तर मला आणखी त्यांच्यापासून धोका होईल, याची जाणीव त्यांना झाल्याने त्यांनी सिव्हिलमधील पोलिसांकडे घडलेल्या खरा प्रकार सांगितला. हल्ला करणाऱ्यांमध्ये मुलीचा मित्र होता, त्याला मी ओळखतो, असेही भुरके यांनी पोलिसांना सांगितले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर