शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिकाऱ्यांकडून ग्रामस्तरीय समितीची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

रहिमतपूर : ग्रामस्तरीय समितीकडून कामात कुचराई होत असल्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात दिरंगाई होत आहे. शासकीय आदेशाचे काटेकोर पालन ...

रहिमतपूर : ग्रामस्तरीय समितीकडून कामात कुचराई होत असल्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात दिरंगाई होत आहे. शासकीय आदेशाचे काटेकोर पालन करून बाधितांची संख्या आटोक्यात आणा, अशा शब्दांत प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांची कानउघडणी केली.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील रहिमतपूर, अपशिंगे, सायगाव, सासुर्वे, दुर्गवाडी, साप आदी गावांना प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, मंडलाधिकारी विनोद सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी काही गावांमध्ये अनेक कोरोनाबाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्याऐवजी होम क्वारंटाइन केल्याचे दिसून आले. त्यामुळे संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे निदर्शनास आले. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गृहविलगीकरणाऐवजी बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे बाधितांना स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची योग्य ती सोय करुन ग्रामस्तरीय समित्यांनी शासकीय आदेशाचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना ज्योती पाटील यांनी केल्या आहेत. विलगीकरण कक्षाची पाहणी करून बाधितांशी चर्चा करून सोयीसुविधा पुरवल्या जातात का याची माहिती घेतली. दरम्यान या वेळी कोरोना ग्रामस्तरीय समितीमधील सदस्यांनी काही बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवल्यास अडचणी येत असल्याचे सांगितले.

जनावरांचे पालनपोषण हा प्रश्न!

गाई व म्हशी असलेल्या बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवल्यास त्यांच्या जनावरांना खाद्य पुरवणे व पालनपोषण करण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे असे बाधित पशुपालक विलगीकरण कक्षात येण्यास विरोध करत असल्याचे सांगितले. काहीही पर्यायी व्यवस्था करा परंतु बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवून लवकरात लवकर संसर्गाची साखळी तोडा अशा स्पष्ट सूचना ज्योती पाटील यांनी केल्या आहेत.

फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव परिसरातील गावांची पाहणी प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केली.( छाया : जयदीप जाधव)

फोटो नेम : १५जयदीप