साताऱ्यात अजितदादांनी लावलेल्या झाडालाच अस्थींचे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:18 IST2026-02-05T18:17:28+5:302026-02-05T18:18:16+5:30

साताऱ्यात अजित पवार यांना अनोखी श्रद्धांजली

Immersion of ashes in the tree planted by Ajit Pawar in Satara | साताऱ्यात अजितदादांनी लावलेल्या झाडालाच अस्थींचे विसर्जन

साताऱ्यात अजितदादांनी लावलेल्या झाडालाच अस्थींचे विसर्जन

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातारा जिल्ह्याशी असलेले नाते हे केवळ राजकीय नसून ते कौटुंबिक आणि ऋणानुबंधाचे होते. याच अतूट नात्याची प्रचिती संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत पाहायला मिळाली. कारण, अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन त्यांनीच दोन वर्षांपूर्वी लावलेल्या वृक्षाच्या मुळापाशी करून बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.

अजित पवार २०२३ मध्ये जेव्हा साताऱ्यात आले होते, तेव्हा राजेंद्र चोरगे यांच्या संकल्पनेतून संगम माहुली येथे उभारण्यात आलेल्या कैलास स्मशानभूमीला त्यांनी भेट दिली होती. या परिसराच्या निर्मितीत अजित पवार यांचे मोठे योगदान होते. त्यावेळी पवार यांनी स्वतःच्या हातांनी येथे एका पिंपळ वृक्षाची लागवड केली होती. आज दोन वर्षांनंतर ते झाड डामडौलात उभे आहे; पण ते लावणारे हात मात्र आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

अजित पवार यांचा अस्थिकलश साताऱ्यात दर्शनासाठी आणला असता, तमाम सातारकरांनी जड अंतःकरणाने आपल्या नेत्याचे दर्शन घेतले. यावेळी राजेंद्र चोरगे यांनी एक भावनिक निर्णय घेतला. ज्या झाडाची लागवड खुद्द अजित पवार यांनी केली होती, त्याच झाडाच्या मुळापाशी त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या. याप्रसंगी बाळासाहेब सोळसकर, अमित कदम, राजेंद्र लवंगारे, संजय कदम, जगदीश खंडेलवाल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अस्तित्व सदैव जाणवत राहील...

कैलास स्मशानभूमीच्या निर्मितीपासून ते विकासापर्यंत अजित पवार यांनी दिलेले बळ सातारा कधीही विसरू शकणार नाही. आज जरी ते देहरूपाने आपल्यात नसले, तरी त्यांनी लावलेल्या या झाडात सातारकरांना त्यांचे अस्तित्व सदैव जाणवत राहील, अशा भावना व्यक्त करताना उपस्थितांचे डोळे अश्रूंनी पाणावले.

Web Title : सतारा में अजित दादा की अस्थियां उसी पेड़ पर विसर्जित हुईं जिसे उन्होंने लगाया था

Web Summary : सतारा में अजित पवार की अस्थियां संगम माहुली श्मशानभूमि में उनके द्वारा दो साल पहले लगाए गए पेड़ के नीचे विसर्जित की गईं। इस भावुक श्रद्धांजलि ने जिले से उनके गहरे संबंध को उजागर किया, जिससे कई लोग भावुक हो गए।

Web Title : Ajit Pawar's Ashes Immersed at Tree He Planted in Satara

Web Summary : In Satara, Ajit Pawar's ashes were immersed at the base of a tree he planted two years ago at Sangam Mahuli crematorium. This poignant tribute highlighted his deep connection to the district, moving many to tears.