कराडमध्ये ‘बो माऊथ गिटारफिश’ची बेकायदेशीर शिकार उघडकीस, दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:18 IST2026-01-20T15:18:33+5:302026-01-20T15:18:52+5:30

दुर्मीळ माशाचा व्हिडिओ प्रसारित व प्रदर्शन 

Illegal hunting of Bow Mouth Guitarfish exposed in Karad, case registered against two | कराडमध्ये ‘बो माऊथ गिटारफिश’ची बेकायदेशीर शिकार उघडकीस, दोघांविरोधात गुन्हा दाखल

कराडमध्ये ‘बो माऊथ गिटारफिश’ची बेकायदेशीर शिकार उघडकीस, दोघांविरोधात गुन्हा दाखल

कराड (जि. सातारा) : आंतरराष्ट्रीय स्तरावर आययूसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर नेचर) संस्थेने गंभीरपणे धोक्यात असल्याचे जाहीर करून रेड डाटा लिस्टमध्ये समाविष्ट केलेल्या बो माऊथ गिटारफिश या दुर्मीळ माशाची कराड येथे बेकायदेशीर शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अमीर दस्तगीर नदाफ (रा. मलकापूर, कराड) आणि ओमकार राजेंद्र मेळवणे (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी या माशाचा व्हिडिओ प्रसारित करून तसेच माशाचे सार्वजनिक प्रदर्शन केल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने कारवाई करीत दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title : कराड में 'बो माउथ गिटारफिश' का अवैध शिकार उजागर; दो पर मामला दर्ज

Web Summary : कराड में दो व्यक्तियों पर लुप्तप्राय 'बो माउथ गिटारफिश' का अवैध शिकार करने और सार्वजनिक रूप से प्रदर्शित करने के लिए वन्यजीव संरक्षण अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया। वन विभाग ने एक वीडियो सामने आने के बाद कार्रवाई की।

Web Title : Illegal 'Bow Mouth Guitarfish' Hunting Exposed in Karad; Two Booked

Web Summary : Two individuals in Karad were booked under the Wildlife Protection Act for illegally hunting and publicly displaying the endangered 'Bow Mouth Guitarfish'. The forest department acted on a tip-off after a video surfaced.