शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

शहाणपण होते, तर १०० रुपयाचे बिल का बुडविले?:अविनाश मोहिते

By admin | Updated: April 18, 2015 00:10 IST

२९० कोटींचे कर्ज माजी अध्यक्ष डॉ. मोहिते यांनी केले. ६५ कोटींत होणाऱ्या कोजन प्रकल्पासाठी १२५ कोटी खर्च आला. त्याचे हप्ते कारखाना अजून फेडतो.

कऱ्हाड : ‘डॉ. इंद्रजित मोहिते हे दुसऱ्याला शहाणपण शिकवतात. २००५ मध्ये जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा यांना सभासदांना सेवासुविधा देण्याचे शाहणपण का सुचले नाही. ऐवढेच आपल्याला शहाणपण होते, तर दिवाळीचे १०० रुपयाचे बिल का बुडविले?,’ असा सवाल यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केले.येणके व किरपे, ता. कऱ्हाड येथील झालेल्या सभासद संपर्क दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक सर्जेराव लोकरे, माजी सरपंच नारायण पाटील, उपसरपंच राहुल गरुड, शामराव गरुड, किरपे-येणके-पोतले पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, किरपेचे माजी सरपंच शामराव माने, सोसायटीचे अध्यक्ष संजय देवकर, उपाध्यक्ष जगन्नाथ माने, उपसरपंच भानुदास माने उपस्थित होते.अविनाश मोहिते म्हणाले, ‘निवडणुकीसाठी आमच्या गावातील मोहिते बंधू फारच उताविळ झाले आहेत. डॉ. इंद्रजित मोहिते कारखान्यावर खोटे नाटे आरोप करीत आहेत. कारखाना कशा पद्धतीने चालला पाहिजे, याबाबत आम्हाला उपदेश करीत आहेत; पण त्यांच्यापेक्षा आम्ही कारखाना चांगला चालविला आहे. तुम्हाला ऐवढेच जर शाहणपण होते, तर दोन रुपये किलो असणारी साखर १४ रुपये का केली. २९० कोटींचे कर्ज माजी अध्यक्ष डॉ. मोहिते यांनी केले. ६५ कोटींत होणाऱ्या कोजन प्रकल्पासाठी १२५ कोटी खर्च आला. त्याचे हप्ते कारखाना अजून फेडतो. मग सांगा कारखान्यावर कर्जाचा डोंगर कुणी केला? आम्ही संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत सभासदांना दोन रुपये किलो दराने वर्षाला ६० किलो साखर देण्याचे वचन पाळले. शेजारील कारखान्यांच्या बरोबरीने उसाला दर दिला. २०११-१२ मध्ये गळिताला आलेल्या उसाला राज्यात क्रमांक चारचा दर दिला. संचालक मंडळाने नेहमी सभासद हिताचे धोरण राबविले. उसाला वेळेवर पाणी, उसाचे वेळेवर गाळप आणि योग्य ऊसदर, हे आपल्या संचालक मंडळाचे धोरण आहे. इरिगेशन योजनांना १६ तास वीज कशी मिळेल, याची व्यवस्था आम्ही केली. यावेळी राहुल गरुड, उपसरपंच भानुदास माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोल पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)