पत्नीच्या रक्षाविसर्जनादिवशी पतीचे निधन, सातारा जिल्ह्यातील वडूज येथील हृदयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:18 IST2025-05-10T16:17:49+5:302025-05-10T16:18:52+5:30
वडूज : पत्नीच्या रक्षाविसर्जन विधीदिवशीच पतीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची हृदयद्रावक घटना वडूज येथे घडली. शोभा महावीर उपाध्ये (वय ...

पत्नीच्या रक्षाविसर्जनादिवशी पतीचे निधन, सातारा जिल्ह्यातील वडूज येथील हृदयद्रावक घटना
वडूज : पत्नीच्या रक्षाविसर्जन विधीदिवशीच पतीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची हृदयद्रावक घटना वडूज येथे घडली. शोभा महावीर उपाध्ये (वय ७०), महावीर भुजबल्ली उपाध्ये (७५) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
कर्नाटकातील शेडबाळ (ता. अथणी) येथील मूळ रहिवासी असलेले उपाध्ये दाम्पत्य २५ वर्षांपासून वडूजमध्ये स्थायिक झाले होते. येथील जैन मंदिराचे पुजारी म्हणून ते काम पाहत होते. मंदिरातील पूजाअर्चा अशा धार्मिक विधीबरोबरच ते सामाजिक कार्यक्रमातही हिरिरीने सहभागी होत होते. शोभा उपाध्ये या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. सोमवार, दि. ५ रोजी त्यांचे निधन झाले. बुधवारी त्यांचा रक्षाविसर्जन विधी झाला होता. रात्री आठ वाजता महावीर उपाध्ये यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
उपाध्ये दाम्पत्याच्या पश्चात तीन मुली, मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. पंडित दिनेश उपाध्ये यांचे ते आई-वडील होत व चांदवड (नाशिक) येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमाचे मुख्य कार्यालयातील लिपिक नीलेश अजमेरा यांचे सासू-सासरे होत.