शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

पावसाच्या फेऱ्यात शेकडो एकर स्ट्रॉबेरी, नुकसान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 4:41 PM

पाऊस नियमाने हजेरी लावत असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक विवंचनेत पडला आहे. कारण, या पावसामुळे झाडांना धोका निर्माण झाला असून फुलांचा बहरही नष्ट होणार आहे. तसेच फळांच्या वाढीवरही परिणाम होणार आहे. झाडांच्या पानावरही थेंब साचून राहत असल्याने लाल करप्या रोग व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपावसाच्या फेऱ्यात शेकडो एकर स्ट्रॉबेरी, नुकसान वाढले करप्याचा रोगाचा प्रदुर्भाव; लष्करी अळीचीही कीड

पाचगणी : पाऊस नियमाने हजेरी लावत असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक विवंचनेत पडला आहे. कारण, या पावसामुळे झाडांना धोका निर्माण झाला असून फुलांचा बहरही नष्ट होणार आहे. तसेच फळांच्या वाढीवरही परिणाम होणार आहे. झाडांच्या पानावरही थेंब साचून राहत असल्याने लाल करप्या रोग व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाबळेश्वर तालुक्यातील लोकांचे आर्थिक जीवनमान उंचविणारे स्ट्रॉबेरी पीक यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अडचणीच्या गर्तेत अडकले आहे. या पावसाच्या पाण्याच्या थेंबामुळे स्ट्रॉबेरीच्या झाडांच्या पानांवर व येणाऱ्या फुलांच्या बहरारास धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढून स्ट्रॉबेरीच्या उत्पन्न वाढीस जोराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी धास्तावलाय. स्ट्रॉबेरीच्या खर्चाची गुंतवणूक व उत्पन्नाचा मेळच बसणे यावर्षी अवघड झालेलं दिसत आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच हवालदिल झाला आहे.जून महिन्यात सुरु झालेल्या पावसाने आतापर्यंत उसंतच न घेतल्याने स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड सुद्धा वेळेत करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे मुळातच स्ट्रॉबेरी हंगामावर त्याचा परिणाम झालाय. परिणामी स्ट्रॉबेरी उशिरानेच मार्केटमध्ये उपलब्ध होणार होती. परंतु आता झाडांना फळ लागण्याची सुरुवात आणि पुन्हा परतीच्या पावसाचा कहर सुरु झाल्याने महाबळेश्वर तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रावरील स्ट्रोबेरीच्या शेतीचे नुकसान होणार आहे.स्ट्रॉबेरीचे उत्पादन व झालेला खर्च याचा ताळमेळ जुळवूने कठीण होणार तर आहेच. त्याच बरोबर उत्पादन घटणार असल्याने स्ट्रॉबेरीची चव घेणं अवघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच स्ट्रॉबेरीच दर गगनाला भिडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.या वर्षी पावसाने सर्वच शेतीचे नुकसान केले असून या अगोदरच महाबळेश्वर तालुक्यतील वाटाणा, बटाटा, फरसबी हातातून गेलं आहे. आता स्ट्रॉबेरीच्या पिकाकडे डोळा लावून शेतकरी बसला होता. परंतु पावसाने व धुक्याने ते पीक सुद्धा हातून निघून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला जाणार आहे.

शासनाने याकडे गांभिर्याने पाहून ओला दुष्काळ जाहीर करीत या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी नुकसान भरपाईसाठी एकवटण्याच्या तयारीत आहे.चव पडणार महाग...ऐकूण उत्पन्नाच्या ८० टक्के स्ट्रॉबेरी म्हाबळेश्वर तालुक्यात घेतली जाते. यावर्षी या पावसाच्या अस्मानी संकटामुळे त्यामध्ये मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाबळेश्वरमधील या लालबुंद रुचकर फळाची चव घेणं महाग होणार आहे.

सततच्या पावसाने आम्हा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरटेच मोडलं असून उत्पादन खर्चाचा मेळ बसविणेसुद्धा अवघड झालं आहे. शेतीचा सर्वच खर्च निघणे दुरापस्त झालं आहे. आता आर्थिक गणितच कोलमडून जाणार आहे.- महेंद्र पांगारे, पांगरीस्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी 

 

 

टॅग्स :RainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानPanchgani Hill Stationपाचगणी गिरीस्थानSatara areaसातारा परिसर