शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘हनी ट्रॅप’चा कऱ्हाडातही ‘डर्टी पिक्चर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

कऱ्हाड : सोशल मीडियाद्वारे ओळख होण्याचा प्रकार नवीन नाही; पण ओळख वाढवून ‘व्हिडिओ कॉल’ची गळ घालण्याचा आणि त्यातून युवकांना ...

कऱ्हाड : सोशल मीडियाद्वारे ओळख होण्याचा प्रकार नवीन नाही; पण ओळख वाढवून ‘व्हिडिओ कॉल’ची गळ घालण्याचा आणि त्यातून युवकांना जाळ्यात ओढण्याचा नवा प्रकार सध्या चांगलाच गाजतोय. कऱ्हाडचे काही युवकही अनोखळी युवतींनी पसरलेल्या या ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकलेत. बदनामी टाळण्यासाठी ते संबंधितांना पैसे पाठवीत असून, हा प्रकार धक्कादायक आहे.

मोबाईलवर अनाहूतपणे एका युवतीचा ‘मेसेज’ येतो. ‘चॅटिंग’मधून ओळख वाढते. या ओळखीचे रूपांतर तथाकथित प्रेमात होते. आणि तेथूनच एक जाळं विणलं जातं. प्रत्यक्षात न पाहिलेली ‘ती’ त्या युवकाला व्हिडिओ कॉलची गळ घालते. तसा कॉल होतोही; पण त्या कॉलला अश्लीलतेची किनार असते. कॉल करणारी युवती स्वत:च स्वत:चे कपडे उतरवते. व्हिडिओ कॉलवर सुरू असलेला हा प्रकार संबंधित युवक निमूटपणे पाहतो. एका मिनिटाचा तो व्हिडिओ कॉल त्यावेळी त्याला सुखावह वाटतो. ओळखपाळख नसलेली युवती व्हिडिओ कॉल करून स्वत:च निर्वस्त्र होते, हा त्या युवकासाठी आश्चर्याचा धक्का असतो; पण खरा धक्का त्याला तेव्हा बसतो, जेव्हा त्या व्हिडिओ कॉलचा ‘स्क्रिन व्हिडिओ’ संबंधित युवती त्या युवकाला पाठवते. त्यासोबतच बदनामी करण्याची धमकी देत ती त्याच्याकडे पैशाचीही मागणी करते.

कऱ्हाड परिसरातील काही युवकांनाही असाच धक्का बसलाय. अनोखळी युवतींनी त्यांना ‘ब्लॅकमेल’ केलंय. ‘व्हिडिओ कॉल’मध्ये स्वत:च कपडे उतरवून त्या युवती आता युवकांनाच बदनामीची धमकी देताहेत. पैसे पाठविले नाही तर व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करून तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी दमदाटी त्यांच्याकडून सुरू आहे. तसेच पोलिसांत जाण्याची धमकीही त्या युवतींकडून दिली जातेय. त्यामुळे या जाळ्यात अडकलेल्या युवकांची भीतीने गाळण उडाली आहे.

- चौकट

नेमकं काय घडतं..?

१) व्हिडिओ कॉल सुरू असतानाच युवती तिच्या मोबाईलवर स्क्रिन रेकॉर्डिंग करते.

२) स्क्रिनमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या युवकाच्या हालचालीही कैद होत असतात.

३) कॉल संपताच स्क्रिन व्हिडिओ पाठवून युवती त्या युवकाला धमकावते.

४) जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ करायला लावल्याची तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार देईन, अशी धमकी ती देते.

५) स्क्रिन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करेन, असेही धमकावले जाते.

६) युवक घाबरल्यास त्याच्याकडे पैशाची मागणी करून ऑनलाईन पैसे पाठवायला सांगितले जाते.

- चौकट

युवती नसते एकटी... हे तर रॅकेट!

सोशल मीडियावर चॅटिंग, व्हिडिओ कॉल आणि कॉल करून धमकावणी युवती एकटी नसते, त्यांचे रॅकेट असते. युवतीने कॉल करून युवकाला धमकावल्यानंतर त्याला आणखी काहीजणांचे कॉल येतात. पैसे पाठविले नाहीस तर तुझी बदनामी करेन, असे वारंवार सांगितले जाते. तसेच तुझा व्हिडिओ आमच्यापर्यंत आला आहे. लवकर हे प्रकरण मिटव, असे म्हणून त्याच्यावर दबावही टाकला जातो.

- चौकट

हिंदीसह मराठी भाषेत संवाद

सोशल मीडियावर युवकांशी ‘चॅटिंग’ करणाऱ्या युवती हिंदीत बोलतात, तर व्हिडिओ कॉलनंतर युवकांना वेगवेगळ्या कॉलवरून धमकावणारे हिंदी तसेच मराठी भाषेत बोलतात. त्यामुळे हे ‘रॅकेट’ नेमके कोठून चालविले जाते, याचा तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे.

फोटो : २१केआरडी०६

कॅप्शन : प्रतीकात्मक