होळी संपली; जिल्हा तापला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:22 IST2021-03-30T04:22:52+5:302021-03-30T04:22:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यातच ...

Holi is over; The district is hot ... | होळी संपली; जिल्हा तापला...

होळी संपली; जिल्हा तापला...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यातच होळी दिवशीच कमाल तापमान ३८ अंशांवर पोहोचल्याने जिल्हा तापू लागला आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे.

जिल्ह्यात हिवाळी ऋतूमध्ये थंडीचे प्रमाण कमी होते. एकवेळ फक्त तापमान ९ अंशांपर्यांत खाली आले होते. मात्र, त्यानंतर तापमान हे सतत १४ ते १५ अशांवर राहिले. त्यामुळे यंदा थंडीची तीव्रता अधिक जाणवली नाही. त्यातच फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून किमान तसेच कमाल तापमानात वाढ झाली. कमाल तापमान तर सतत ३५ अंशांवर होते. आता मार्च महिना संपत आला असून, किमान तापमान २० अशांवर जाऊ लागले आहे. तर कमाल तापमानही ३५ अंशांवर आहे. यामुळे थंडी गायब झाली आहे. सातारा शहरात तर कमाल तापमान सतत ३५ अंशांवर आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तर ऊन वाढले आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरीवर्ग सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे करत आहेत. गेल्या चार दिवसांत तर कमाल तापमान हे ३६, ३७ अंशांवर राहिले आहे. यामुळे उन्हाची तीव्रता आणखी वाढत जाणार हे स्पष्ट झाले आहे.

चौकट :

साताऱ्याचे किमान आणि कमाल तापमान असे...

दि. १५ मार्च १८.०२ ३५.०७

दि. १६ मार्च १८.०८ ३६.०१

दि. १७ मार्च १९ ३६.०४

दि. १८ मार्च १९.०५ ३६.०४

दि. १९ मार्च २१.०४ ३५.०५

दि. २० मार्च १९.०१ ३५.०१

दि. २१ मार्च १८.०९ ३४.०५

दि. २२ मार्च १९.०१ ३५.०८

दि. २३ मार्च २१.०५ ३३.०५

दि. २४ मार्च २०.०७ ३६.००

दि. २५ मार्च १९.०३ ३६.०१

दि. २६ मार्च २०.०५ ३८.०१

दि. २७ मार्च २०.०४ ३८.००

दि. २८ मार्च २०.०० ३८.०५

दि. २९ मार्च १९.०७ .......

.........................................................................

Web Title: Holi is over; The district is hot ...