शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

मार खाऊनही ‘आळी मिळी गूप चिळी’!

By admin | Updated: November 18, 2015 00:06 IST

पालिकेत मारहाण ’नाट्य’ : दखल न घेतल्यास आत्महत्या करण्याचा कर्मचाऱ्याचा इशारा; प्रशासनामध्ये खळबळ

सातारा : नगर विकास आघाडीतील दोन नगरसेवकांमध्ये सध्या सुरू असलेली धूसफूस एका बिगाऱ्यावर राग काढण्यापर्यंत गेली. गेल्या वर्षभरापासून संबंधीत कर्मचाऱ्याला एक नगरसेवक टॉर्चर करत असल्याचा आरोप होत असून , या प्रकाराला कंटाळलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.पालिकेचे कर्मचारी राजू देडगे हे गेल्या सोळा वर्षांपासून पालिकेत कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती बिगारी म्हणून करण्यात आली असली, तरी ते सध्या मुकादम म्हणून काम करत आहेत. काही वर्षांपूर्वी देडगे हे माजी नगराध्यक्ष सचिन सारस यांचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. परंतु माशी कुठे शिंकली हे कोणालाच समजले नाही. देडगे हे नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांच्या जवळचे मुकादम म्हणून पालिकेत वावरू लागले.याच रागातून सारस आपल्यावर चिडून असल्याचा देडगेंचा आरोप आहे. सारस वारंवार टार्गेट आणि टॉर्चर करत असल्याचा आरोप करत देडगे यांनी सोमवारी पालिकेत थेट सारस यांनाच याचा जाब विचारला. हा प्रकार नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांच्या कानावर गेल्यानंतर तेही संतापले. सचिन सारस नगराध्यक्ष असताना जयेंद्र चव्हाण आणि सारस यांच्यात शितयुद्ध झाल्याचे पालिकेतील सर्वांना ठाऊक आहे.त्यामुळे दोघांतील मतभेदाचा राग देडगेंवर निघाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.एका नगरसेवकाने संबंधिताच्या कानाखाली थप्पड मारली, याची बातमी वाऱ्यासारखी पालिकेत पसरली. मात्र, हा प्रकार घडला तरी देडगेंनी गप्प राहणं पसंत केलंय. त्याची कारणेही ते देतायत.‘ज्यांनी मला मारलं ते माझ्या भावासारखे आहेत. माझ्या सख्या भावांपेक्षा त्यांचा माझ्यावर अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी मला मारलेल्याचे प्रकरण मला वाढवायचे नाही. परंतु जे लोक मला टॉर्चर करतायत. त्यांच्या विरोधात मी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. यातूनही मार्ग निघाला नाही तर शेवटी आत्महत्येचा माझ्यापुढे पर्याय आहे,’ असे खळबळजनक वक्तव्य राजू देडगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.’ त्यामुळे हा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता असल्याने सगळ्यांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)‘थप्पड प्रकरण’ वाढवायचे नाही..नगरसेवकांकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात मुकादम राजू देडगेंनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. ‘तुझी काही तक्रार असेल तर आम्हाला सांग, संघटना तुझ्या पाठीशी आहे. पुन्हा असा काही प्रकार घडला, तर आपण कामबंद आंदोलन करू, असे देडगे यांना संघटनेकडून आश्वासन देण्यात आले आहे. परंतु हे प्रकरण वाढवायचे नाही, असे देडगेंचे म्हणणे आहे. त्यामुळे संघटनाही सध्या बघ्याच्या भूमिकेत आहे.माझ्या कार्यकाळात पालिकेतील दहा मुकादमांची पदोन्नती मी केली आहे. मात्र त्यामध्ये देडगे यांचा समावेश केला नाही. ते बिगारी आहेत. त्यामुळेच माझ्यावर देडगेंकडून खोटे आरोप होत आहेत.-सचिन सारस (माजी नगराध्यक्ष, सातारा पालिका)