थकीत वीज बिल भरून शाळेस मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST2021-02-27T04:51:22+5:302021-02-27T04:51:22+5:30

बामणोली : कोरोना काळात अनेक शाळांची वीजबिले थकली आहेत. सदर बिलांची रक्कम खूप मोठी असल्याने पैसा कोठून आणायचा, याची ...

Help the school by paying the overdue electricity bill | थकीत वीज बिल भरून शाळेस मदत

थकीत वीज बिल भरून शाळेस मदत

बामणोली : कोरोना काळात अनेक शाळांची वीजबिले थकली आहेत. सदर बिलांची रक्कम खूप मोठी असल्याने पैसा कोठून आणायचा, याची समस्या अनेक मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाली आहे. तेटली (ता. जावली ) प्राथमिक शाळा याला मात्र अपवाद ठरली आहे. गावातील मुंबईकर मंडळी व तरुण ग्रामस्थ एकत्र येत त्यांनी देणगी गोळा करून शाळेचे थकीत लाईट बिल भरले.

ग्रामस्थांच्या मदतीमुळे शाळेसमोर असलेली अडचण दूर झाली आहे. गावचे विजयशेठ भोसले यांनी शाळेसाठी प्रोजेक्टर भेट दिला. शिवाय प्रताप भोसले, विठ्ठल भोसले, युवराज सर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शाळेस इतर शैक्षणिक साहित्य भेट दिले. प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी या साहित्याची खूपच गरज होती, असे शाळेचे मुख्याध्यापक महेश पडलवार यांनी सांगितले.

यावेळी भरत भोसले, बबन भोसले, पांडुरंग भोसले, प्रकाश भोसले यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

Web Title: Help the school by paying the overdue electricity bill