शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत संगणक परिचारकांची ससेहोलपट

By admin | Updated: September 18, 2014 23:24 IST

कर्मचाऱ्यांतून संताप : कागदावर आठ हजार मात्र हातात मिळतात चार हजार

परळी : ‘जादा काम... कमी दाम आणि तेही वेळेवर नाही,’ अशी अवस्था राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचारकांची झाली आहे. त्यांचा कागदावर पगार ८,४०० रुपये आणि हातात मिळतात अवघे चार हजार, अशी ससेहोलपट सुरू आहे.राज्याचा चौफेर विकास व्हावा, या दृष्टीने राज्य शासनाने संगणक प्रणालीचा वापर ग्रामपातळीवर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०११ पासून राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचे व्यवहार संगणक प्रणालीने जोडण्यात आले. या संगणक प्रणालीसाठी ज्या ग्रामपंचायतीने संगणक बसवले त्या ग्रामपंचायतींसाठी संगणक परिचारिक नियुक्त करण्यात आले. यांना मात्र आजअखेर एकदाही वेळेवर वेतन मिळाले नाही.संगणक परिचारिकांना ८४०० रुपये वेतन देण्यात यावे, असे त्यांच्या नियुक्तीपत्रात असून प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हातात ४ हजार रुपये तेही तीन-चार महिन्यांनी दिले जातात. कामाचा विचार करता हा पगार तुटपुजांच आहे. ठेकेदारांकडून फारच सुंदर खुलासा केला जातो. या ८४०० रुपये पैकी ४ हजार ४०० रुपये हे स्टेशनरी दुरुस्तीसाठी व इतर खर्च तर ४ हजार वेतन असे असते, असा खुलासा देण्यात आला. प्रत्यक्षात खर्चाचा तपशील पाहता तीन महिन्यांनी संगणक कामकाजासाठी कागद दिला जातो. त्यांची किमत फक्त १५० रुपये होते. दुरुस्तीसाठी खर्च किती केला जातो, हे जागेवर काम करणारा कर्मचारीच सांगू शकेल. (वार्ताहर)४ हजार ४०० रुपये कशासाठी?कागदावर परिचारकांचा पगार ८,४०० आहे तर हातात ४ हजार मिळतात. मग चार हजार ४०० रुपये कशासाठी आणि कोण गायब करते, कोणाच्या खिशात त्याचा मलिदा जातो, का वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून याची टप्प्या-टप्यात वाटणी होते, असा संतप्त सवाल होत आहे. तर ठेकेदारांचे आणि वरिष्ठांचे काय साटेलोटे आहे की काय? अश्ी चर्चा ग्रामस्थांमधून आहे. तीन महिन्यात एकदा १५० रुपये खर्च येणाऱ्या कागदासाठी ठेकेदारांकडून चक्क महिना ६०० रुपये बिल लावले जात आहे, याची चौकशी करावी, अशीही मागणी होत आहे.आम्हाला महिन्याच्या महिन्याला पगार मिळत नाहीत. वारंवार ग्रामसेवकांना यांची कल्पना द्यावी लागते. त्यावेळी कुठेतरी पगार मिळतो; परंतु रितसर पगार ८४०० आहे तर हातात फक्त ४००० रुपये मिळतात, यातील सर्वच पैसे म्हणजे ४४०० रुपये ठेकेदारांच्या घशात जातात, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर कर्मचाऱ्याने दिली.