शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला सामान्यांची काळजी नाही

By admin | Updated: November 18, 2015 00:09 IST

पृथ्वीराज चव्हाण : खोडशी येथे ज्योर्तिलिंग मंदिराच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी आरोप

कऱ्हाड : ‘सध्याच्या सरकारने निर्बंध उठवताच डाळींचे दर महागले. यामुळे व्यापाऱ्यांना चांगलाच याचा फायदा झाला. हे लक्षात आल्यानंतर सरकारने धान्याच्या साठ्यांवर छापे टाकले. त्यानंतर व्यापारी न्यायालयात गेले. परंतु हा खेळ करत असताना सर्वसामान्यांचे जीवन असाह्य झाल्याने त्यांची काळजी या सरकारला पडलेली नाही,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.खोडशी, ता. कऱ्हाड येथे आमदार फंडातून सुमारे २७ लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी आमदार आनंदराव पाटील होते. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, माई ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, किसनराव पाटील-घोणशीकर, सांगलीचे सचिदानंद कदम, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, कऱ्हाड बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, जखिणवाडीचे माजी सरपंच अ‍ॅड. नरेंद्र पाटील, अश्विनी लवटे, खोडशी सरपंच मनीषा तांबे, उपसरपंच सचिन भोसले, नामदेव पाटील, रमेश लवटे, डॉ. सतीश थोरवडे, बाळासाहेब पवार, कृष्णत पवार आदी उपस्थित होते.आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘खोडशीच्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या कामामध्ये शासन निधीबरोबर माहेरवाशिणी व दानशूरांनी मदत केल्याने हे काम पूर्णत्वास गेले आहे.सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याने अर्थकारण कोलमडले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या उसाचा दर ठरवण्याची जबाबदारी सरकारने पाळलेली नाही. दुसरीकडे डाळीचे दर वाढले आहे. त्याचबरोबर या वर्षी पाणी व चाऱ्याचे संकट आपल्यासमोर आहे. याबाबत सरकार गंभीर नाही.’ असा आरोप आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचंड जनसंपर्काचा विरोधकांमध्ये पोटशूळ निर्माण झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना गट-तट न पाहता प्रत्येक गावात विकास पोहचवला.’यावेळी मनोहर शिंदे, संगीता साळुंखे, सचिदानंद कदम, हंबीरराव भोसले, संभाजीराव भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.राजेंद्र पाटील व सुरेश भोसले यांनी स्वागत केले. विजय माने यांनी प्रास्ताविक केले. युवराज पवार यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)