शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडी दारी... कचरा रस्त्यावरी

By admin | Updated: January 10, 2015 00:14 IST

वडूज परिसरातील अवस्था : ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

वडूज : देशात स्वच्छता मोहिमेचे वारे जोरात वाहत असताना इकडे वडूजमधील काही भागांत याचे महत्त्वच न समजल्याचे दिसते. ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून स्पष्ट होत आहे. घंटागाडी दारी... तरी कचरा रस्त्यावरी, अशी अवस्था काही परिसरात आढळून येत आहे.
आपले अंगण व आपला परिसर स्वच्छ असावा, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने स्वच्छता मोहीम राबविली. या पाठीमागचे कारण ही स्पष्ट असून, दिवसन्दिवस देशात आरोग्याच्या समस्या वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम सर्व देशभर राबविली जात आहे. वडूजमधीलच काही घटक (माणसे) दर रविवारी स्वच्छता मोहीम न चुकता राबवित आहेत.
काही भागांतील परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. परंतु हे ढीग काढायचे कोणी? यावर एकमत न झाल्याने ढिगाऱ्यामध्ये कचऱ्याची वाढ होत आहे. वडूज परिसरातील अपुऱ्या नागरी सुविधा व तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे झपाट्याने होणारी घरे, दुकाने व दवाखाने यामुळे दैनंदिन स्वच्छता करताना ग्रामपंचायतीला मर्यादा पडत
आहेत.
वडूजमधील काही युवक हनुमान वॉर्डमध्ये वास्तव्यास आहेत. ते दर रविवारी या वॉर्डमधील स्वच्छता करीत असतात. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, अशा आशयाचा संदेश सुद्धा सोशल मीडियावर फिरत आहेत. परंतु दखल घ्यायची कुणी. थेट ग्रामपंचायतीकडे बोट दाखवून सर्वजण नामनिराळे होत आहेत. वडूज ग्रामपंचायतीकडे दोन घंटागाडी व ट्रॅक्टर-ट्रॉली असून, नऊ आरोग्य कर्मचारी असा ताफा आहे. मात्र दैनंदिन काही प्रमुख भागातील स्वच्छता (गटार काढणे), बाजार पटांगण लोटणे आदी कामातच आठवडा जातो. त्यामुळे ग्रामपंचायतीची अवस्था इकडे आड अन् तिकडे विहीर अशी झाली आहे. इच्छाशक्ती असूनही ग्रामपंचायतीला हा अतिरिक्त भार पेलवेना. त्यामुळे गरज आहे ती वडूजकरांनी आपल्याच मानसिकतेत बदल करण्याची आणि स्वत:चा परिसर स्वत:च स्वच्छ करण्याची.
दैनंदिन घंटागाडी प्रत्येक वॉर्डमधील गल्ली बोळातून फिरत असते; परंतु धगधगत्या जीवनात (स्वत:च निर्माण करून घेतलेल्या) घंटागाडी येण्याची वाट पाहण्या इतकासुद्धा वेळ नसलेल्या वडूजकरांनी काही परिसरातील सार्वजनिक, वादग्रस्त जागेत, गटारामध्ये कचरा टाकणे सोयीचे मानत आहेत.
आपल्या दारातील कचरा दुसऱ्याच्या दारात टाकून त्यांचे व स्वत:चे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजणार कधी? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. (प्रतिनिधी)


नोटिसा बजावणार
काही भागात तोंडी सूचना देऊनही जाणीवपूर्वक कचरा टाकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीकडून प्रथम नोटिसा बजावणार आहे. ग्रामस्थांकडून या प्रकरणी जर काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर प्रसंगी संबंधितांवर कठोर निर्णय घेणार असल्याचे सरपंच कांताताई बैले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.