शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
2
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
3
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
4
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
5
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
6
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
7
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
8
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
9
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
10
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
11
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
12
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
13
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
14
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
15
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
16
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
17
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
18
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
19
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
Daily Top 2Weekly Top 5

शहरातला कचरा रस्त्यावर !

By admin | Updated: March 29, 2016 00:46 IST

लातूर : नांदगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास नांदगांव व वरवंटी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे शहरातला कचरा रस्त्यावर साचला आहे़


लातूर : नांदगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास नांदगांव व वरवंटी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे शहरातला कचरा रस्त्यावर साचला आहे़ गेल्या महिनाभरापासून कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून, शहरात जिकडे तिकडे कचरा साचला आहे़ दररोज १०० टन कचरा साचत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ कचऱ्याच्या प्रश्नावर नांदगांव ग्रामस्थ व मनपा अधिकाऱ्यांची बैठक अनेकदा झाली़ परंतू, तोडगा निघाला नसल्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर कचरा साचला आहे़ हरीत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन लातूर मनपाने केले असल्याचा आरोप ग्रामस्थांचा असून, न्यायालयाच्या आदेशानुसार कचऱ्याची विल्हेवाट न लावता डेपोवर कचरा टाकला जातो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़
लातूर शहरातील कचरा नांदगांव येथील कचरा डेपोवर गेल्या अनेक वर्षांपासून टाकला जातो़ परंतू, ओला व सुका कचरा असे वर्गीकरण केले जात नाही़ शिवाय, कचरा डेपोला संरक्षण भिंत बांधली गेली नाही़ तसेच कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरते़ त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ परिसरातील पाणी दूषीत होत आहे़ त्यामुळे नागरिकांनी हरीत न्यायालयात धाव घेतली होती़ न्यायालयाने गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संरक्षण भिंत बांधण्याचे तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला दिल्या होत्या़ परंतू, न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता कचरा टाकला जात असल्याने गावकऱ्यांनी कचरा टाकण्यास विरोध केला आहे़ त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शहरातला कचरा शहरातल्या रस्त्यांवर साचत आहे़ दररोज १०० टन कचरा साचत असल्याने सद्यस्थितीत शहरात ३ हजार टन कचरा साचला आहे़
पोलिस बंदोबस्तात मनपाने कचरा डेपोवर कचरा टाकण्या प्रयत्न केला़ परंतू, नांदगांव व परिसरातील गावकऱ्यांनी विरोध कायम ठेवला आहे़ दररोज २५ ट्रॅक्टर कचरा डेपोवर टाकला जात होता़ दोन दिवसांपूर्वी १५ ट्रॅक्टर कचरा पोलिस बंदोबस्तात टाकण्यात आला़ ही बाब गावकऱ्यांना समजताच त्यांनी विरोध केला आहे़ त्यामुळे पुन्हा शहरातला कचरा ठप्प झाला आहे़ औसा रोड, नांदेड नाका, विवेकानंद चौक, रेणापूर नाका व रिंगरोड परिसरात कचऱ्याचे ढीग पडले आहेत़ स्वच्छता निरीक्षक कलीम शेख यांनी गावकऱ्यांची भेट घेवून कचरा डेपोवर टाकण्या संदर्भात विनंती केली़ परंतू, अगोदर न्यायालयाच्या निर्देशानुसार उपाययोजना करा नंतरच कचरा टाका अशी भुमिका गावकऱ्यांनी घेतली आहे़ (प्रतिनिधी)