शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी दलाचा अध्यक्ष असल्याचे सांगत चार लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:02 IST

Fraud Crimenews Police satara- मी झोपडपट्टी दलाचा अध्यक्ष असल्यामुळे माझी सरकारी कार्यालयात ओळख आहे. मी झोपडी बांधण्याकरिता महाबळेश्वरमध्ये कोठेही जागा मिळवून देऊ शकतो. वीज जोडणी देतो, झोपडीचा सातबारा उतारा मिळवून देतो, असे आश्वासन देत दहाहून अधिक महिलांची ३ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात ऋषिकेश अरुण वायदंडे (रा. महाबळेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देझोपडपट्टी दलाचा अध्यक्ष असल्याचे सांगत चार लाखांची फसवणूक दहा महिलांची तक्रार : महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा

महाबळेश्वर : मी झोपडपट्टी दलाचा अध्यक्ष असल्यामुळे माझी सरकारी कार्यालयात ओळख आहे. मी झोपडी बांधण्याकरिता महाबळेश्वरमध्ये कोठेही जागा मिळवून देऊ शकतो. वीज जोडणी देतो, झोपडीचा सातबारा उतारा मिळवून देतो, असे आश्वासन देत दहाहून अधिक महिलांची ३ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात ऋषिकेश अरुण वायदंडे (रा. महाबळेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत पूनम विशाल चरखे यांनी म्हटले आहे की, ऋषिकेश वायदंडे याने डिसेंबर २०१७ मध्ये मी झोपडपट्टी दलाचा अध्यक्ष असल्यामुळे माझी सरकारी कार्यालयात ओळख आहे. मी तुम्हाला झोपडी बांधण्याकरिता महाबळेश्वरमध्ये कोठेही जागा मिळवून देऊ शकतो, असे सांगितले. त्याच्या शब्दावर विश्वास ठेऊन हक्काचे घर मिळेल, या आशेने चरखे यांनी संघटनेची सभासद फी प्रथम तीनशे रुपये भरले. त्यावेळी तेथेच असलेल्या सुशीला पठारे यांनी त्यांच्याकडील वहीमध्ये चरखे यांचे नाव, पती-पत्नीचा फोटो चिकटवून सही घेतली.

आधारकार्डची झेरॉक्स दिली परंतु सभासद असल्याचे ओळखपत्र दिले नाही. त्यानंतरही वायदंडे याच्या झोपडीकरिता जागा मिळवून देतो, या शब्दावर विश्वास ठेऊन चार हजार रुपये दिले. वायदंडेने वेळोवेळी झोपडीच्या अनुषंगाने बैठक, वाई, सातारा, पुणे येथे मोर्चा, जयंतीचे कारण सांगून सातशे रुपये रोख असे एकूण पाच हजार रुपये घेतले आहेत. झोपडीसाठी जागा मिळवून देण्याबाबत विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.ऋषिकेश वायदंडे याने महाबळेश्वरमधीलच रेणुका दिलीप साळुंखे, नंदा नारायण भट, जैबुनिसा नूरमोहम्मद जुंद्रे, लीला दत्तात्रय वाडकर, पुष्पा आनंदा चिकणे, कल्पना विश्वास पार्टे, राजश्री राजेंद्र गायकवाड, लक्ष्मी आनंदा ढेबे, जयश्री खंडू वाघमारे, सुशीला भाऊसाहेब पठारे यांनाही झोपडीसाठी जागा मिळवून देतो, असे आश्वासन देऊन त्यांच्याकडून ३ लाख ८९ हजार रुपये घेत फसवणूक केली असल्याचे तक्रारदार पूनम चरखे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

वायदंडे आज ना उद्या काम करेल, असे वाटल्याने तक्रार देण्यास उशीर झाल्याचेही चरखे यांनी म्हटले आहे. याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी ऋषिकेश वायदंडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे, बाबुराव वरे अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :fraudधोकेबाजीSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस